मुंबई : आपल्या आजारावर उपचार करण्यासाठी अभिनेता इरफान खान लंडनमध्ये आहे. इरफान खानला न्यूरोएंडोक्राइन कॅन्सर झाला आहे. चांगली गोष्ट ही आहे की, ट्रिटमेंट घेतल्यानंतर इरफान खानमध्ये खूप चांगला बदल पाहायला मिळत आहे. आता सध्या तरी इरफान खान भारतात येईल असं वाटत नाही. कारण लंडनमध्ये राहून पुढील उपचार तो घेत आहे. या दरम्यान इरफान खानचा आताचा फोटो समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोत इरफान खूप बारीक जिसत आहे. या फोटोत तो खूप थकला असल्याचं देखील दिसत आहे. या फोटोत इरफान एका खिडकीसमोर उभा आहे. आणि कानात ईअरफोन घालून काही तरी एकत असल्याचं दिसत आहे. हा फोटो ट्विटरवर प्रोफाईल फोटो म्हणून ठेवला आहे. या फोटोंत इरफान हसताना दिसत आहे. 



इरफान खानचा खूप जवळचा मित्र आणि फिल्ममेकर नुकताच त्याला भेटून भारतात परतला आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, इरफान खानची तब्बेत कमी वेगाने पण चांगली होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इरफान खान या वर्षाच्या अखेरीस भारतात परत येईल. 


इरफान खानने लिहिलेलं भावनिक पत्र 


मला हाय-ग्रेड न्युरोएण्डोक्राइन कॅन्सर आहे असं निदान होऊन आता बराच काळ झालाय. माझ्या शब्दसंग्रहात सामील झालेलं हे नवीन नाव म्हणे खूपच दुर्मीळ आहे. साहजिकच अभ्यासासाठी अत्यंत कमी केसेस आणि तुलनेने कमी माहिती यामुळे उपचारांबाबतही खूप अनिश्चितता आहे. एकंदर मी एका ट्रायल अॅण्ड एरर खेळाचा भाग आहे.


मी खरं तर वेगळ्याच खेळात रमलेलो होतो, एका वेगवान ट्रेनने प्रवास करत होतो. स्वप्नं होती, बेत होते, आकांक्षा होत्या, ध्येय होती. त्यातच गुंतलेले होतो. अचानक कोणीतरी माझ्या खांद्यावर थोपटलं आणि वळून बघतो तर तो टीसी होता. म्हणाला: "तुमचं स्टेशन आलंय जवळ. प्लीज उतरा ट्रेनमधून.” मी गोंधळून गेलो: "नाही, नाही, माझं स्टेशन नाही आलेलं.” “नाही, हेच तुमचं स्टेशन आहे. कधीकधी ते असंच येतं.”


या अचानक बसलेल्या धक्क्याने मला जाणीव करून दिली की मी तर समुद्रात तरंगणारा एक ओंडका आहे फक्त, अनिश्चित अशा प्रवाहात तरंगणारा! आणि मी जिवाच्या आकांताने त्या प्रवाहावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतोय.