कोलकत्ता: अभिनेता इरफान खान सध्या कोलकत्तामध्ये करीब करीब सिंगल या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र त्याची सह कलकार पार्वती नसल्ययाने इरफानने एका खास अंदाजामध्ये ट्विटदेखील केले आहे. 



 


राजेश खन्नांच्या 'अमर प्रेम' या चित्रपटातील 'आय हेट टीअर्स ...' हा डायलॉग इरफान खानने पार्वती या त्याच्या सहअभिनेत्रीसाठी म्हटला आहे. 'अमर प्रेम' मधील होडीवर उभं राहून इरफानने ' कोकलत्त्यातील डेट करीब करीब अकेले खत्म हो गई .. लावकरच मुंबईत भेट असे तो म्हटला आहे. तसेच इरफान ने त्याच बोटीत बसून मीडियाशीदेखील संवाद साधला. .


हिंदी मिडियम या चित्रपटानंतर इरफान ' करीब करीब सिंगल' हा चित्रपट घेऊन रसिकांच्या भेटीला येणार आहे. इरफानसोबत या चित्रपटामध्ये पार्वती झळकणार आहे. पार्वतीने मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. १० नोव्हेंबर रोजी हा चित्रपट झळकणार आहे. 
झी स्टुडिओ प्रस्तुत   करीब करीब सिंगल हा चित्रपट तनुजा चंद्रा यांनी दिग्दर्शित केला आहे.