मुंबई : बॉलिवूड अभिनेते इरफान खान यांचं मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात बुधवारी निधन झालं. वयाच्या 54व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. इरफान यांच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. इरफान यांच्या जाण्याने एक जबरदस्त अभिनेता गमावला असल्याची प्रतिक्रिया कलाविश्वातून व्यक्त होतेय. बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत इरफान यांनी आपल्या अभिनयाची वेगळीच छाप निर्माण केली. एकाच साच्यातील चित्रपट न करता विविध भूमिका साकारणारा अभिनेता पठाण कुटुंबात जन्मलेला असूनही शुद्ध शाहाकारी होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इरफान खानचं पूर्ण नाव साहबजादे इरफान अली खान. त्यांचा जन्म एका मुस्लिम पठाण कुटुंबात झाला होता. पण मुस्लिम कुटुंबात जन्म होऊनही इरफान शुद्ध शाकाहारी होते. त्यामुळेच त्यांचे वडील त्यांना मस्करीमध्ये पठाण कुटुंबात एक ब्राम्हण जन्मला असल्याचं म्हणायचे.


इरफानचे वडील त्यांना शिकारीसाठी घेऊन जायचे. जंगलाचं वातावरण त्यांना आवडायचं, पण जनावरांची शिकार करणं त्यांना पटायचं नाही. शिकारीनंतर या जनावरांच्या कुटुंबाचं काय होईल असा विचार त्यांच्या मनात यायचा. त्यामुळे त्यांना रायफल चालवता यायची पण ते कधी शिकार करायचे नाहीत.


दरम्यान, एनएसडीमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर काही दिवसांनंतर त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यामुळे घरातून पैसे मिळणं बंद झालं. त्यानंतर एनएसडीमधून मिळणाऱ्या फेलोशिपमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. 1995मध्ये ते क्लासमेट असलेल्या सुतापा सिकंदरशी लग्नबंधनात अडकले.


इरफान खान यांनी 'पीकू', 'लाईफ ऑफ पाय', 'स्लमडॉग मिलेनिअर', 'पान सिंह तोमर', 'हासिल', 'लाईफ इन अ मेट्रो', 'तलवार', 'ये साली जिंदगी', 'हैदर', 'जज्बा', 'अंग्रेजी मिडियम' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे.