नवी दिल्ली : दीपिका पदुकोणचा 'छपाक' चित्रपट १० जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसादही मिळतोय. प्रेक्षकांकडून दीपिकाच्या भूमिकेचं कौतुक होतंय. असं होत असलं तरी उच्च न्याायलयाकडून चित्रपटावर बंदी घालण्याचे आादेश दिले आहेत. याचं कारण म्हणजे 'छपाक'मध्ये ऍसिड अटॅक पिडितेचे वकील अपर्णा भट्ट यांना चित्रपटात क्रेडिट देण्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने फॉक्स स्टुडिओची याचिका फेटाळून लावली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने याचिकेवर सुनावणी करताना पटियाला हाऊस कोर्टाच्या निर्णयालाच योग्य ठरवलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 'छपाक'च्या प्रदर्शनापूर्वी ऍसिड अटॅक पिडितेच्या वकील अपर्णा भट्ट यांनी पटियाला हाऊसमध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये चित्रपटात त्यांना क्रेडिट न दिल्याबाबत सांगितलं होतं. या प्रकरणात पटियाला हाऊसने चित्रपट निर्मात्यांना 'छपाक'च्या प्रदर्शनापूर्वी अपर्णा भट्ट यांना क्रेडिट देण्याचे आदेश दिले होते. परंतु छपाकच्या मार्केटिंग फॉक्स स्टुडिओने पटियाला हाऊसच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं.





आता याप्रकरणी, दिल्ली उच्च न्यायालयाने, पटियाला हाऊसच्या निर्यणाला योग्य ठरवत फॉक्स स्टुडिओची याचिका फेटाळून लावली आहे. 


उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता चित्रपट निर्मात्यांना वकील अपर्णा भट्ट यांना क्रेडिट द्यावं लागणार आहे. १५ जानेवारीपर्यंत चित्रपटात अपर्णा भट्ट यांना क्रेडिट न दिल्यास, मल्टीप्लेक्स आणि लाईव्ह स्ट्रिमिंगमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनावर रोख लावण्यात येणार असल्याचं दिल्ली न्यायालयाने सांगितलं आहे. इतर चित्रपटगृहात १७ जानेवारीपासून प्रदर्शनावर बंदी घालण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.