Hrithik Roshan-Saba Azad: बॉलीवूड हे विश्व असं आहे की ज्या विश्वातून दररोज काहीतरी नवी खबर ही येतच असते. नुकत्याच येणाऱ्या खबरींनुसार सध्या बॉलीवूडमध्ये प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. त्यातून मोठे मोठे स्टार्स सध्या या ना त्या सेलिब्रेटीच्या प्रेमात अखंड बुडालेले दिसत आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेली वीस वर्षे आपल्या अभिनयाने आणि आपल्या स्टंटबाजीने सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारा अभिनेता म्हणजे ऋतिक रोशन.. सतत नव्याने तो प्रेक्षकांपुढे आला आहे. आपल्या स्टंटबाजीने त्याला सर्वात जास्त लोकप्रियता मिळाली आहे. क्रिशच्या सिनेमांच्या सिरिजमुळे तर तो भलताच फेमस झाला. 


इंडस्ट्रीचा देव हृतिक रोशन गेल्या काही काळापासून अभिनेत्री आणि गायिका सबा आझादला डेट करत आहे. आता हे दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं ऐकिवात आहे. हे दोघेही नुकतेच पॅरिसमधील सुट्टीवरून परतले आहेत आणि आता त्यांच्या लग्नाची बातमी इंडस्ट्रीत आगीसारखी पसरली आहे. एका प्रसिद्ध ज्योतिषाने हृतिकच्या कुंडलीत दोन विवाहांचा योग असल्याचे भाकीत केले होते. त्यावेळी ही गोष्ट चांगलीच चर्चेत होती आणि आज पुन्हा एकदा हीच गोष्ट हेडलाईन बनत आहे.


हृतिक आणि सबा हॅप्पी रिलेशनशिपमध्ये आहेत. ते खूप वेळ एकत्र घालवतात. सबाचे हृतिक रोशनची पत्नी सुझैनसोबतही चांगले संबंध आहेत. यासोबतच ती हृतिकच्या मुलांमध्येही खूप चांगली मिक्स-अप होते. समोर आलेल्या माहितीनुसार हे कळते की, दोघांनाही त्यांच्या नात्याला आणखी थोडा वेळ द्यायचा आहे. सध्या दोघेही लग्नाचा विचार करत नाही आहेत पण ते दोघं कधीही लग्न करण्याची शक्यता आहे. 


हृतिकची एक्स वाईफ सुझैन देखील अभिनेता अर्सलान गोनीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघे अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसतात. केवळ सुझानच नाही तर हृतिकचीही अर्सलानसोबत चांगली बाँडिंग आहे. नुकतेच चौघेही एकत्र गोव्याच्या सहलीला गेले होते. आपल्या घटस्फोटाची घोषणा करताना हृतिक आणि सुजैन म्हणाले होते की दोघे नेहमीच एकमेकांचे मित्र राहतील आणि एकमेकांना नेहमीच साथ देतील. 


हृतिक लवकरच दीपिका पदुकोणसोबत 'फायटर' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. याआधी त्याचा सैफ अली खानसोबतचा 'विक्रम-वेधा' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट माधवन आणि विजय सेतुपती स्टारर विक्रम-वेधाचा अधिकृत रिमेक आहे. हा चित्रपट यावर्षी 30 सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.