Gautami Deshpande: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे गौतमी देशपांडे आणि मृण्मयी देशपांडे हिची. सध्या त्यांचा एक फोटो हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे गौतमी कुणाला डेट करते आहे का याची जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी त्या दोघीही सुंदर अशा पारंपारिक सांड्यांमध्ये दिसत आहेत. सोबतच त्यांनी एकत्र सुंदर अशा पोजेसही दिल्या आहेत. यावेळी त्यांनी सुंदर पोझेस दिल्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. यावेळी दोन्ही देशपांडे बहीणींनी एका लग्नात हजेरी लावली होती. त्यामुळे त्या दोघींची चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यांनी सुंदर अशा साड्या परिधान केलेल्या होत्या. त्यांचा साजशृंगार पाहून चाहतेही त्यांच्यावर फिदा झाले आहेत. यावेळी गौतमी देशपांडेसोबत स्वानंद तेंडूलकर दिसतो आहे. त्यातून मृण्यमी देशपांडेसोबत तिचा पती स्वप्नील राव आहे. त्यांचा हाच फॅमिली फोटो चर्चेत आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृण्मयी ही आपल्या सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे. तिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. हिंदी आणि मराठी मनोरंजन क्षेत्रात ती सक्रिय आहे. त्यामुळे तिची सर्वत्र जोरात चर्चा ही रंगलेली असते. त्यातून तिची सख्खी बहीण मृण्मयी देशपांडेही आता टेलिव्हिजन क्षेत्रात सक्रीय आहे. तिचीही सोशल मीडियावर जोरात चर्चा असते. सध्या झी मराठीवरील सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या पर्वासाठी ती सुत्रसंचालन करते आहे. त्यामुळे सध्या तिचीही जोरात चर्चा आहे. मराठी सेलिब्रेटींच्या डेटिंगच्याही जोरात चर्चा रंगलेल्या असतात. त्यातून कोण कोणासोबत डेट करतेय याचीही जोरात चर्चा रंगलेली असते. आता सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष हे गौतमी देशपांडेकडे वळलं आहे. 


हेही वाचा : स्वतःवर टीका सहन झाली नाही म्हणून कंगनानं आलियावर ओढले ताशेरे... 'तिच्या बुद्धीकडे आधी पाहा'


यावेळी नेटकऱ्यांनी या त्यांच्या फोटोवर कमेंट्स करायला सुरूवात केली आहे. एका युझरनं म्हटलंय की, ''हम्म्मम, हम्मम'' तर दुसऱ्या एकानं कमेंट केली आहे की, ''अभिनंदन स्वानंद दादा' तर तिसऱ्या एकानं कमेंट केली आहे की, ''अरे स्वानंद तेंडुलकर'' तर काहींनी म्हटलंय की, ''तेंडूलकरांनी सेच्युरी मारली वाटतं?'' तर एकानं लिहिलंय की, ''गौतमी आणि स्वानंद खरंच?'' अशा कमेंट्समुले चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. 



स्वानंद तेंडूलकर हा भाडिपा या लोकप्रिय मराठी युट्यूबर चॅनलचा व्हाईस प्रसिडंट आहे. तो एख कॉन्टेंट क्रिएटर आहे आणि त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते.