मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री पूजा बत्रा आणि अभिनेता नवाब शहा ही जोडी एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. पूजा आणि नवाब सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर असतात. मात्र आता नवाब शहाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमुळे दोघांनी गूपचूप लग्न केलं असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवाबने इन्स्टाग्रामवर लाल रंगाचा चूडा घातलेला एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमुळे पूजा आणि नवाब यांनी लग्न केलं असल्याची चर्चा होत आहे. यापूर्वीही दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर केले होते. मात्र आता शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमुळे सर्वत्र त्यांनी लग्न केल्याचं बोललं जात आहे. या व्हिडिओवर अनेक चाहत्यांकडून शुभेच्छाही देण्यात येत आहेत.




मात्र अद्याप या दोघांनीही त्यांच्या लग्नाच्या चर्चांबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 


पूजा बत्राने याआधी आर्थोपेडिक सर्जन डॉ. सोनू एस अहलूवालियासोबत लग्न केलं होतं. २००२ ते २०१० पर्यंत ते दोघे एकत्र होते. मात्र २०११ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. पूजाने 'विरासत', 'हसिना मान जायेगी', 'नायक' यांसारख्या चित्रपटातून भूमिका साकारल्या आहेत. 


नवाबने टेलिव्हिजनमधून त्याच्या करियरची सुरुवात केली. त्याने 'लक्ष्य', 'डॉन २', 'भाग मिल्खा भाग', 'दिलवाले', 'टायगर जिंदा है' या चित्रपटांतून झळकला आहे. नवाबने नुकतंच आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित संजय दत्त, अर्जुन कपूर आणि क्रिती सेनन स्टारर 'पानीपत' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. सध्या नवाब सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हासह आगामी 'दबंग ३'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.