सैफ अली खानचा लेक करतोय `या` अभिनेत्रीच्या मुलीला डेट? वेकेशचे फोटो समोर
दोघं एकाच दिवशी मुंबई एअरपोर्टवर स्पॉट केल्यानंतर दोघं एकत्र वेकेशनला जाण्याच्या बातमीवर जोर धरला आहे.
Palak Tiwari Ibrahim Amrita Airport Photos : पलक तिवारी आणि इब्राहिमच्या डेटिंगच्या बातम्या गेल्या काही दिवासांपासून सतत समोर येताना दिसत आहेत. मात्र नुकतेच साराने तिच्या सोशल मीडियावर गोवा वेकेशनचे फोटो भाऊ इब्राहिमसोबत शेअर केले होते. तर दुसरीकडे पलकनेदेखील तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर गोव्याचे काही फोटो शेअर केले होते. यानंतर अशी बातमी समोर आल्या होत्या की, पलक, सारा, इब्राहिम आणि अमृता सिंहसोबत गोव्याला वेकेशनला गेली आहे. तर नुकतेच इब्राहिम आणि अमृताला एअरपोर्टवर स्पॉट केलं गेलं. तर दुसरीकडे पलकदेखील एअरपोर्टवर स्पॉट झाली. मात्र यावेळी पलक इब्राहिम आणि अमृतासबोत स्पॉट झाली नाही. तिघंही खूप खुश दिसत होते. ज्यामुळे या चर्चांनी जोर धरला आहे. पाहा या तिघांचा मुंबई एअरपोर्टवरील फोटो.
इब्राहिम अली खानची आई अमृता सिंहला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट केलं गेलं. इब्राहिम सामानाने भरलेली ट्रॉली घेवून जातान दिसला. तर अमृता चॉकलेट्सचे पॅकेटने आपला चेहरा लपवताना दिसली. या दरम्यान आई आणि मुलगा दोघांनी मॅचिंग व्हाईट कलरचा शर्ट परिधान केला होता. इब्राहिमने पाठीमागे बॅग हँग केली होती आणि डोक्यावर ब्लॅक कॅप घातली आहे.
जेव्हा अमृता सिंह एक ट्रॉली ड्रॅग करताना दिसली तर दुसऱ्या हातात चॉकलेटच्या पॅकेटने चेहरा कव्हर करण्याचा प्रयत्न करत होती. पापाराझी पुन्हा-पुन्हा तिला पोज देण्यासाठी सांगत होते. मात्र ती कॅमेरापासून स्वत:ला लपवताना दिसली. बरेच लोकं अमृतासोबत एअरपोर्टवर सेल्फी घेताना दिसले. मात्र अमृता पापाराझीच्या कॅमेरापासून वाचण्यासाठी चेहरा लपवताना दिसली.
तर दुसरीकडे पलक तिवारी लूज ग्रे कलरचा पजामा आणि फिटिंगचा ब्लॅक टॉप घातला. यासोबतच अभिनेत्रीने डोक्यावर कॅप घातली होती. यासोबतच तिने तिचा चेहरा ब्लॅक गॉगल्सने कवर केला होता. चेहऱ्यावर गोड स्माईल अभिनेत्रीची शोभा वाढवत होते. फोटोत अभिनेत्रीने ब्लॅक हॅण्डबॅग घेतली होती. पलक आणि इब्राहिमची टाईमिंग बाहेर पडण्याची एक नव्हती मात्र दोघांना एकाच दिवशी मुंबई एअरपोर्टवर स्पॉट केल्यानंतर दोघं एकत्र वेकेशनला जाण्याच्या बातमीवर जोर धरला आहे.