नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिच्या करिअरमध्ये सलमान खानचे खूप मोठे योगदान असल्याचे आपण जाणतोच. खरंतर सलमान खाननेच कतरिनाला बॉलिवूडमध्ये रिलॉन्च केले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर ती खऱ्या अर्थाने नावारूपाला आली. इतकेच नाही तर काही वर्षांपूर्वी कतरिनाला चित्रपटात काम मिळत नव्हते, तेव्हा पुन्हा एकदा सलमान कतरिनाच्या मदतीला धावून गेला आणि 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या चित्रपटासाठी तिचे नाव सुचवले. आता ती 'टाइगर जिंदा है' या आगामी चित्रपटात सलमान खानसोबत झळकणार आहे. यामुळे कतरिना देखील सलमानला स्वतःसाठी लकी मानते. 


बॉलिवूडलाईफच्या वृत्तानुसार आपली बहीण इसाबेल हीला देखील सलमानने बॉलिवूडमध्ये लॉन्च करावे अशी कतरिनाची इच्छा आहे. सलमान खानसोबत काम केल्यानंतर कतरिना खऱ्या अर्थाने नावारूपाला आली आणि आपल्याप्रमाणे आपल्या बहिणीचे करियर देखील उत्तम व्हावे अशी कतरिनाची इच्छा आहे. कतरिना स्वतः आपल्या प्रॉडक्शन हाऊसमधून इसाबेलला लॉन्च करणार होती. परंतु, काही समस्यांमुळे तो प्लॅन रद्द करावा लागला. म्हणून सलमानने तिला लॉन्च करावे अशी तिची इच्छा आहे. 








इसाबेल देखील कतरिनाप्रमाणे एक मॉडेल असून तिला देखील बॉलिवूड चित्रपटात काम करायचे आहे.