मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया ही लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे. बोल्ड अंदाज आणि सुंदर अभिनय ही तमन्नाची खासियत आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येही तमन्नाचे लाखो चाहते आहेत. तमन्ना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साऊथ सिनेसृष्टीतील सुंदर अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या सुंदर स्टाईलने करोडो लोकांना वेड लावलं आहे. त्याचवेळी अभिनेत्रीबाबत नुकतीच अशी बातमी समोर आली आहे. जे ऐकून त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. सध्या सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे. त्यानुसार तमन्ना लवकरच मुंबईतील एका व्यावसायिकाशी लग्न करणार आहे. त्याचबरोबर या बातमीवर मौन सोडत अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर जबरदस्त उत्तर दिलं आहे.


तमन्नाने एक मजेदार व्हिडिओ शेअर केला 
तमन्नाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर दोन मजेदार व्हिडिओ शेअर केले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये ती काळ्या रंगाची सुंदर साडी नेसून खोलीत जाते. दुसऱ्या व्हिडीओमध्ये ती मुलाच्या रुपात रुममधून बाहेर येते. या व्हिडिओमध्ये तमन्नाने मिशीही लावली आहे. व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'हा माझा बिझनेसमन पती आहे.' याशिवाय अभिनेत्रीने हॅशटॅगमध्ये 'प्रत्येकजण माझ्या आयुष्याची स्क्रिप्ट लिहित आहे' असं लिहिलं आहे. तमन्नाची ही मजेशीर प्रतिक्रिया चाहत्यांनाही खूप आवडली आहे.


या चित्रपटांमध्ये तमन्ना दिसणार आहे
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तमन्ना भाटिया लवकरच सुपरस्टार चिरंजीवीसोबत 'भोला शंकर' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात चाहत्यांना दोघांची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. या दोघांशिवाय या चित्रपटात कीर्ती सुरेश देखील दिसणार आहे. येत्या १४ एप्रिलला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती 'गुरुगुंडा सीता कलाम' आणि मल्याळम चित्रपट 'बांद्रा'मध्येही दिसणार आहे.