Kalki 2898 AD Release Date: अभिनेता प्रभासचा (Prabhas) बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट कल्कि 2898च्या (Kalki 2898 AD) प्रदर्शनाची तारिख लांबणीवर पडली आहे. चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर आणि टीजर रिलीज केले होते. मात्र, त्यानंतरच निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. प्रभासच्या फर्स्ट लूक पोस्टर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्यामुळंच हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. (Kalki 2898 AD Release Date)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रभास, दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दिशा पाटनी अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. याआधी चित्रपटाचे पोस्टर आणि टीजर रिलीज करण्याबरोबरच चित्रपटाचे नावही जाहीर करण्यात आले. यापूर्वी चित्रपटाचे प्रोजेक्ट के असं नाव होते. मात्र, चित्रपटाचे प्रत्यक्षात नाव कल्कि 2989 एडी असं आहे. निर्माते दोन भागांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार करत आहेत. 


चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर लूक झाल्यानंतर सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. प्रभासचा लूक पाहून नेटकरी त्याला स्वस्तातला आयरन मॅन म्हणत आहेत. तर, दीपिका पादुकोणच्या फोटोशॉप लूकवर देखील टीका करण्यात येत आहे. तर, हा संपूर्ण चित्रपट हॉलिवूड फिल्म ड्यूनचा ड्युप्लिकेट असल्याचंही बोललं जात आहे. 


Kalki 2898 AD चित्रपटावर आलेल्या प्रतिक्रियानंतर या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. 12 जानेवारी 2024मध्ये मकर संक्राती आणि पोंगलच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होणार होता. मात्र, निर्माते प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्याच्या विचारात आहेत, अशी माहिती कळतेय. चित्रपटात VFXचे भरपूर काम अपूर्ण असल्याने निर्माते काही महिने तारिख पुढे ढकलू शकतात, अशी चर्चा आहे. 


इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, तेलुगू चित्रपटसृष्टीतील सूत्रांनी सांगितल्यानुसार, चित्रपटाचे निर्माते नाग अश्वीन 9 मे रोजी चित्रपटाची रिलीज डेट ठरवू शकतात. कारण ही तारिख त्यांच्यासाठी लकी आहे. त्यांची जगदेका वीरुडु अतिलोका सुंदरी' आणि 'महानती' या सुपरहिट मुव्ही त्याच तारखेला रिलीज झाल्या होत्या. त्यामुळंच चित्रपटाची रिलीज डेट मेपर्यंत वाढवण्यात येऊ शकते. 


Kalki 2898 AD हा चित्रपट बिग बजेट असून बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार यात दिसणार आहेत. यापूर्वी प्रभास आदिपुरुष या चित्रपटात दिसला होता. यात त्याने प्रभू श्रीरामाची भूमिका साकारली होती. मात्र, चित्रपटातील संवाद आणि व्हिएफएक्समुळं सिनेमा वादात अडकला होता. अनेक राज्यात या चित्रपटाला विरोध करण्यात आला होता. तसंच, मोठ्या विरोधानंतर चित्रपटातील संवाद बदलण्यात आले होते.