मुंबई : एकीकडे मुंबईत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत होत्या... आणि दुसरीकडे जान्हवी कपूर मात्र डीनर डेटसाठी दाखल झाली होती... आता तुमच्या मनात कुणासोबत? हा प्रश्न आलाच असेल... तर या प्रश्नाचं उत्तर आहे इशान खट्टर...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किडस् आपलं भवितव्य आजमावण्यासाठी दाखल होत आहेत... त्यापैंकीच ईशान आणि जान्हवी.... जान्हवी अभिनेत्री श्रीदेवी - बोनी कपूर यांची मुलगी तर ईशान अभिनेता शाहीद कपूरचा भाऊ... गेल्या काही दिवसांपासून जान्हवी - ईशान एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. 


ईशान खट्टर

नुकतंच या दोघांना मुंबईत वांद्र्यातील एका रेस्टॉरन्टमध्ये एकत्र पाहिलं गेलं. दोघंही सफेद रंगाच्या ड्रेसमध्ये पाऊस एन्जॉय करत डीनर डेटवर पोहचले होते. या दोघांना याआधीही अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. 


'धडक' या सिनेमाची अनेक जण उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. हा सिनेमा करण जोहरच्या दिग्दर्शनाखाली तयार होतोय. 'सैराट' या मराठी सुपरहीट सिनेमाचा हा रिमेक आहे. २० जुलै रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.


जान्हवी कपूर

श्रीदेवी यांच्या निधनानंतर जान्हवी भावनात्मकरित्या काहीशी कोलमडली होती... परंतु, हिंमत दाखवत तिनं आपल्या सिनेमाची शुटींग सुरू ठेवली. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं शुटिंग पूर्ण झालंय.