मुंबई : अभिनेता ईशान खट्टर आणि त्याची कथित गर्लफ्रेंड चांदनी बेंज यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये इशान पहिल्यांदाच त्याची गर्लफ्रेंड चांदनीसोबत सार्वजनिकरित्या दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक त्यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहिद कपूरचा भाऊ आणि बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टर त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. नुकताच या अभिनेत्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो पहिल्यांदाच त्याच्या कथित गर्लफ्रेंडसोबत सार्वजनिकरित्या दिसत आहे. ईशान खट्टरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. जिथे पापाराझींनी त्याची कथित गर्लफ्रेंड चांदनी बेंजसोबत कॅमेऱ्यात कैद केलंय. दोघंही एका कार्यक्रमादरम्यान एकत्र दिसले होते.


चांदनीसोबत इशान दिसला
वास्तविक, इशान त्याच्या मित्राच्या एंगेजमेंट फंक्शनला आला होता. फंक्शन संपल्यानंतर तो तिथून त्याची कथित गर्लफ्रेंड चांदनी बेंजसोबत बाहेर येताना दिसला. ईशान चांदनीचा हात पकडून कसा बाहेर आला हे व्हिडिओमध्ये दिसत आहे.


यानंतर, अभिनेत्याने त्याच्या प्रेयसीला कारमध्ये बसवलं आणि नंतर पापाराझीसाठी पोज देण्यासाठी आला. व्हिडिओमध्ये ईशानची गर्लफ्रेंड चांदनी लांब प्रिंटेड ड्रेस आणि हील्स घातलेली दिसत होती. दुसरीकडे, इशानने स्काय ब्लू शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेला दिसला. पापाराझींना पोज दिल्यानंतर ईशान चांदनीच्या गाडीतून निघून गेला.


या व्हिडिओवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या
इशान आणि चांदनीचा हा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका यूजरने कमेंट करत लिहिलं आहे की, 'ती खूप सुंदर आहे.' दोघांची जोडी चांगली आहे'. तर दुसऱ्याने लिहिलं आहे की, 'इशानही त्याच्या भावासारखा सुंदर आहे'. तर आणखी एका युजरने लिहिलं आहे की, 'दोघं एकत्र खूप छान दिसत आहेत'.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


ईशानचं नाव कुणासोबत जोडलं जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ईशान खट्टर आणि अनन्या पांडे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. राजस्थानच्या रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये न्यू ईयर साजरं करताना दोघं पहिल्यांदा प्रकाशझोतात आले होते. दोघांनी 'खाली पीली'  चित्रपटात एकत्र काम केलं आहे. आता ईशान लवकरच 'द परफेक्ट कपल' या हॉलिवूड सिरीजमध्ये दिसणार आहे.