Ishita Dutta baby boy: बॉलिवूड अभिनेत्री इशिता दत्ता आणि अभिनेता वत्सल सेठ यांच्या घरी लहाण पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्या दोघांच्या बाळाची त्यांचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा करत होते. तर आता त्यांनी सगळ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अखेर ते दोघं आई-वडील झाले असून इशितानं मुलाला जन्म दिला आहे. काल बुधवारी इशितानं मुलाला जन्म दिला आहे. त्याची माहिती इशिताच्या जवळच्या व्यक्तीनं दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्ट्सनुसार, मंगळवारी इशिताला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल बुधवारी तिनं मुलाला जन्म दिला. दरम्यान, वत्सलनं नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या याविषयी सांगितलं आहे. वत्सलनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून इशिता आणि त्यांच्याबाळासोबत फोटो शेअर केला आहे. या फोटोत बाळाच्या चेहऱ्यावर गुलाबी रंगाचं हार्ट इमोटिकॉन वापरलं आहे. हा फोटो शेअर करत वत्सलनं कॅप्शन दिलं की आम्ही. आमच्या आयुष्यात देवाच्या आशीर्वादारुपी मुलाचा जन्म झाला आहे. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि प्रेमासाठी खूप खूप शुभेच्छा. 



रिपोर्ट्सनुसार, इशिताला 48 तास रुग्णालयात ठेवणार येणार आहे. तर शुक्रवारी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. तर दत्ता आणि सेट कुटुंबात आनंदाचा क्षण आहे. सगळ्यांना आनंद झाला आहे. लग्नाच्या सहा वर्षांनंतर इशितानं पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. 


हेही वाचा : कारावासातील ते 63 दिवस राज कुंद्रा आणणार रुपेरी पडद्यावर


इशितानं काही दिवसांपूर्वीच तिच्या शाध सेरेमनीचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत त्यांनी या परंपरेचा अर्थ आणि त्यात काय काय करतात हे सांगितलं होतं. या व्हिडीओत सांगण्यात आलं आहे की शाध एक बंगाली परंपरा आहे, ज्यात प्रेग्नंट महिलेला तिच्या माहेरी बोलवतात आणि तिच्या आवडीचं जेवणं बनवतात. हा एक प्रकारे ओटी भरणीच्या कार्यक्रम आहे. व्हिडीओत इशिताला तिची आई जेवण भरवताना दिसत आहे. ज्यात खूप बंगाली पदार्थ आणि मिठाई आहेत.  


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


इशिता आणि वत्सल या दोघांनी 28 नोव्हेंबर 2017 मध्ये मुंबईतील जुहू येथे स्थित असलेल्या इस्कॉन मंदिरात गुपचुप पद्धतीनं लग्न लावून दिलं होतं. त्या दोघांची भेट ही छोट्या पडद्यावरील 'रिश्तों का सौदागर- बाजीगर' च्या सेटवर झाली होती. त्या मालिकेनंतर इशिता आणि वत्सल जवळ आले होते. त्यांच्या मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले होते. इशिताच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ‘दृश्यम’ चित्रपटांमध्ये अजय देवगणच्या मोठ्या मुलीची भूमिका इशितानं साकारली होती.