मुंबई : पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल साईदा इम्तियाज (Saeeda Imtiaz)ला सध्या सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. साईदाने सोशल मीडिया बिकीनीमधील फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे तिला ट्रोल केलं जात आहे.  लोक तिला धर्माचा दाखला देवून वाईट बोलत आहेत. साईदाने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या बायोपिकमध्ये अभिनय केला, तर जाणून घेवू साईदा इम्तियाज कोण आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सईदा इम्तियाज ही पाकिस्तानी-काश्मिरी वंशाची आहे पण तिच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे. सईदाचा जन्म 24 मे 1990 रोजी यूएईमधील अबुधाबी शहरात झाला होता. साईदा मिळून एकून 8 भावंड आहेत. साईदाकडे फक्त अभिनयाचं कौशल्यानसून ती उच्च शिक्षित आहे. साईदाने न्यूयॉर्क यूनिवर्सिटीमधून  सायकॉलजी और सोशियॉलजीचं शिक्षण घेतलं आहे.


साईदाने वयाच्या 23व्या वर्षी म्हणजे 2013साली मॉडलींग क्षेत्रात पदार्पण केलं. मॉडलींगपूरता फक्त मर्यादित न राहाता तिने अभिनयाकडे देखील स्वतःचा मोर्चा वळवला.  पण तिला अभिनयात हवं तसं यश मिळलं नाही. पण ती खचली नाही. सईदा इम्तियाजने 2021 साली पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्या बायोपिक 'कप्तान: द मेकिंग ऑफ ए लेजेंड' मध्येही काम केले होते.



चित्रपटात साईदाने इम्रान खान यांची पहिली पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांची व्यक्तीरेखा साकारली होती. साईताने 'कप्तान' चित्रपटाशिवाय 'वजूद' आणि 'थोड़ी सेटिंग थोड़ा प्यार' चित्रपटात देखील काम केलं आहे. सईदा इम्तियाज कदाचित चित्रपटांमध्ये फारशी यशस्वी ठरली नाही, पण ती सोशल मीडियावर मात्र लोकप्रिय आहे.