मुंबई : मराठी सिनेसृष्टीत आजवरची सर्वात बोल्ड वेबसिरीज रानबाजार नुकतीच प्रदर्शित झाली आहे. या वेबसिरीजमुळे मराठी सिनेसृष्टीत नक्कीच हादरा बसेल हे नक्की. दिग्दर्शक अभिजित पानसे पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन प्रेक्षकांनाच्या भेटीला आले आहेत. पानसे यांच्या 'रानबाजार' या वेबसिरीजचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा टीझर पाहून मराठी सिनेसृष्टीतला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड टीझर असल्याचं स्पष्ट होत आहे. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसिरीजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळत आहे. ही वेबसिरीज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवघ्या काही वेळातच या वेबसिरीजने सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.या वेबसिरीजमध्ये  प्राजक्ता माळीसह तेजस्विनी पंडितही आव्हानात्मक भूमिकेत आहे. त्यामुळे ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येताच . या सिरीजने धुमाकूळ घातला आहे. मुख्य म्हणजे या वेबसिरीजच्या प्राजक्ता माळीच्या टीझर वर युजर्स तुटून पडले होते. प्राजक्ता माळीच्या बोल्ड सीनवर चाहते तीव्र प्रतिक्रीया देत आहेत.


या आधी या सिरीजचे तीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या तीन्ही भागाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. या उदंड प्रतिसादानंतर रानबाजारचे पुढचे दोन एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आणि यामुळेच प्राजक्ताने या संदर्भातील एक पोस्ट शेअर केलीये.



खरंतर प्राजक्ताची ही पोस्ट रानबाजार वेबसिरीजचे पुढचे भाग प्रदर्शित होणार असल्याचं सांगणारी आहे. या पोस्टमध्ये प्राजक्ताने एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती एका खोलीत मॅक्सीमध्ये बसलेली दिसत आहे. याचबरोबर तिच्या हातात कंडोमही दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत प्राजक्ताने कॅप्शनमध्ये लिहीलंय की, 'पब्लिक आज और दो एपिसोड आ रहें हैं। रानबाजार' Time निकालके देखने का... अवघ्या काही वेळातच प्राजक्ताची ही पोस्ट व्हायरल होत आहे. एवढच नव्हेतर प्राजक्ताच्या या पोस्टने प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता वाढवली आहे.