नवी दिल्ली : बॉलिवूडचा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांचा नवा चित्रपट 'इत्तेफाक' ३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटात अक्षय खन्ना देखील मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. १९६९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'इत्तेफाक' या चित्रपटाचा हा रिमेक आहे. चित्रपटात सिद्धार्थ विक्रम नावाचे पात्र रंगवत आहे. ज्याच्यावर त्याची पत्नी आणि वकील शेखर सिन्हा अशा २ खुनांचा यांच्या आरोप आहे. तर सोनाक्षी वकील शेखर सिन्हा यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. 



चित्रपटात या सगळ्या प्रकरणाचा छडा देव म्हणजे अक्षय खन्ना लावत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर करण जोहरने आपल्या ट्विटर अकाउंट वर शेअर केला. त्याचबरोबर शाहरुखने देखील या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. आणि ट्विट मध्ये म्हटले आहे की, "या चित्रपटाची निर्मिती गौरी खान, कारण जोहर आणि रेणू रवी चोपडा यांनी मिळून केली आहे. हा चित्रपट ३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असून चित्रपटाचा फर्स्ट लूक आज प्रदर्शित झाला. यामध्ये अक्षय खन्नाचा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.