मुंबई : बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान याचे नाव सतत एखाद्या अभिनेत्री, मॉडेलसोबत जोडले जाते. अशापैकी नुकतेच जोडले गेलेले एक नाव म्हणजे 'लुलिया वेंतुर '. मात्र लुलियानेही सलामानऐवजी आता हिंदी सिनेक्षेत्रातील एका कलाकारासोबत स्वयंवर रचले आहे.  


जय भानुशालीची निवड 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


  लुलिया सलमान खानसोबत अनेक पार्ट्यांमध्ये दिसली होती. तिच्या चित्रपटांसाठी सलमान खानने प्रोमोशनला मदतही केली होती. मात्र आता सलमान खानऐवजी लुलिया एका रिएलिटी शोमध्ये जय भानुशालीच्या गळ्यात माळ घालताना दिसली.  


 
खास  स्वयंकर 


 


'द वॉईस इंडिया किड्स' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता जय भानुशाली करतो. या कार्यक्रमामध्ये लुलिया सहभागी झाली होती. त्यामुळे प्रत्यक्ष आयुष्यात नव्हे तर या कार्यक्रमापुरता आयोजित स्वयंवरामध्ये लुलियाने जयची निवड केली आहे.   


कशावरून झाली निवड ? 


लुलिया आणि मनीष पॉल त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनला गेले होते. त्यावेळेस साथीदाराच्या अपेक्षांमध्ये ज्याला चांगली दाढी असेल त्याची निवड होईल असे सांगत लुलीयाने जयची निवड केली आहे.