Jackie Shroff च्या पत्नीला 58 लाखांचा चुना, वाचा काय आहे प्रकरण
Jackie Shroff`s Wife Ayesha Shroff : जॅकी श्रॉफ यांच्या पत्नी आयशा श्रॉफ यांची तब्बल 58 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. त्या प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अशात पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरु केला आहे.
Jackie Shroff's Wife Ayesha Shroff : बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफची पत्नी आयशा श्रॉफची फसवणुक करण्यात आली आहे. या प्रकरणी आयशानं पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अॅलन फर्नांडिस असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यानं आयशा श्रॉफ यांची तब्बल 58 लाखांची फसवणूक केली. पोलिसांनी आयशा श्रॉफ यांनी केलेल्या या तक्रारीची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्यावर आयपीसीच्या अनेक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण अजून त्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली नाही.
जॅकी श्रॉफ यांची पती आयशानं केलेली तक्रार ही सांताक्रुझ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. आयशानं अॅलन फर्नांडिस नावाच्या व्यक्तीवर फसवणूक केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या वतीनं आयपीसी कलम 420, 408, 465, 468 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमांच्या अंतर्गत कोणत्याही व्यक्तीला 7 वर्षे तुरुंगवास आणि दंड देखील भरावा लागतो. तर या सगळ्या कलमांच्या अंतर्गत 58 लाखांची फसवणूक केली आहे.
आयशा श्रॉफविषयी बोलायचं झालं तर त्या अभिनेता जॅकी श्रॉफ यांची पत्नी आहेत. त्यासोबत त्या एक अभिनेत्री, मॉडल देखील आहेत. आता त्या अभिनय क्षेत्रापासून लांब असल्या तरी प्रोड्युसर म्हणून काम करत आहेत. जॅकी यांच्यासोबत लग्नबंधनात अडकल्यानंतर त्यांनी मोठ्या पडद्यापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. तर आयशानं तिच्या करिअरच्या सुरुवातीला ‘तेरी बाहों में’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट 1984 साली प्रदर्शित झाला होता. 1984 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आयशा यांच्यासोबत मोहनीश बहल मुख्य भूमिकेत होते. तर आयशा यांनी प्रोड्युसर म्हणून सगळ्यात आधी ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘ग्रहण’ आणि ‘बूम’ सारखे चित्रपट होते.
हेही वाचा : 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचे वडील दुसऱ्यांदा अडकणार विवाह बंधनात!
दरम्यान, या आधी आयशा श्रॉफनं 2015 अभिनेता साहिल खान विरोधात फसवणूक आणि धमकी दिल्याच्या आरोपाखाली तक्रार दाखल केली होती. आयशा श्रॉफ या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.