'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचे वडील दुसऱ्यांदा अडकणार विवाह बंधनात!

Sumbul Father Marriage: सुंबलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नाविषयी सांगितलं आहे. तिच्या वडिलांच्या लग्नानंतर त्यांना फक्त एक आई नाही तर एक लहान बहीणही भेटणार आहे. त्यांच्या लग्नासाठी खूप आनंदी असल्याचे सुंबलनं यावेळी सांगितले आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 9, 2023, 02:20 PM IST
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचे वडील दुसऱ्यांदा अडकणार विवाह बंधनात!  title=
(Photo Credit : Social Media)

Sumbul Father Marriage: छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सुंबूल तौकीर खानचे वडील लवकरच दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहेत. सुंबूलनं तिच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नाची बातमी स्वत: सांगितली आहे. सुंबूल ही सहा वर्षांची होती तेव्हा तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. तर सुंबूलच्या वडिलांनी त्या दोघांना लहानाचं मोठ करत सांभाळलं. इतकंच नाही तर अभिनय करण्यासाठी तिला प्रोत्साहन दिलं. तर सुंबूलनं तिच्या वडिलांच्या लग्नाविषयी काय माहिती दिली ते सांगितलं आहे. 

सुंबूल काही महिन्यांपूर्वीच बिग बॉस 16 मध्ये दिसली होती. त्यानंतर तिनं तिच्या वडिलांनी केलेल्या स्ट्रगल विषयी सांगत तिला आणि तिची बहीण सानियाला कसं सांभाळलं हे सांगितलं. तर आता सुंबल आणि सानिया या दोघींनी त्यांच्या वडिलांना दुसऱ्या लग्नासाठी तयार केलं आहे. तर तिच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नाविषयी सुंबूलनं ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. सुंबलनं सांगितलं की तौकीर खान यांच्या होणाऱ्या पत्नीचे नाव निलोफर असे नाव असून पुढच्या आठवड्यात विवाह बंधनात अडकणार आहेत. निलोफर देखील एक घटस्फोटीत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सुंबूल खान यावेळी म्हणाली, "मी माझ्या वडिलांसाठी खूप आनंदी आहे. मी त्या दोघांचे आमच्या कुटुंबात स्वागत करत आहे. फक्त आई नाही तर त्यांच्यासोबत आम्हाला एक बहीणही भेटणार आहे. आम्ही सर्व उत्सुक आहोत. माझ्या वडिलांनी आम्हाला नेहमीच प्रेरणा दिली आहे. मी आणि माझी धाकटी बहीण बाबांसाठी खूप आनंदी आहोत. ‘बिग बॉस 16’ मध्ये मला भेटायला आलेले माझे मोठेबाबा इकबाल हुसैन खान यांनी या लग्नासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आणि आम्ही त्यांचे आभारी आहोत.”

हेही वाचा : नेहू- रोहूचं बिनसलं? Neha Kakkar च्या वाढदिवसाला पतीची अनुपस्थिती नात्यातील वादळावर प्रकाश टाकणारी

'बिग बॉस 16' नंतर फक्त सुंबल नाही तर तिचे वडील तौकीर खान यांना देखील चांगली लोकप्रियता मिळत आहे. ते त्यांच्या कवितांसाठी ओळखले जातात. त्यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ते छोट्या पडद्यावरील मालिकांसाठी कोरिओग्राफर म्हणून काम करायचे.

सुंबल लवकरच एका गाण्यात दिसणार आहे. याविषयी बोलताना सुंबल म्हणाली, माझं आगामी गाणं ही माझी बहीण, बाबा आणि माझ्यासाठी खूप खास आहे आणि आम्ही त्यासाठी खूप प्रयत्न करत आहोत. दसरम्यान, त्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सानिया आणि मी दोघींनी हे गाणं गायलं आहे. हे गाणं तयार आहे फक्त त्याच्या व्हिडीओ करण्याची आम्ही प्रतिक्षा करत आहोत.