मुंबई :  टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या बातमीवर शिक्कामोतर्ब झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्टनुसार विराट कोहली आणि अनुष्काची १२ डिसेंबर रोजी इटलीमध्ये हा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. मात्र अनुष्काच्या पीएने मात्र या लग्नाच्या बातमीचं खंडन केलं आहे. मात्र विराटकडून या बातमीवर काहीच उत्तर मिळालेलं नाही. त्यामुळे या लग्नसोहळ्यांचा संस्पेस ठेवला जात असतानाच बॉलिवूड अभिनेत्री जॅक्लीन फर्नांडीसने मात्र पडदा उठवला आहे.


रविवारी लक्स गोल्डन रोज अवॉर्डच्या रेड कार्पेटच्या क्षणी अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. यावेळी मीडियातील लोकं कलाकारांना विराट - अनुष्काच्या लग्नासंदर्भात प्रश्न विचारले जात होते. तेव्हा अनेकांना प्रश्न विचारला की, जर खरंच या दोघांचं लग्न असेल तर तुम्ही त्यांना काय शुभेच्छा द्याल. यावेळी अभिनेत्री जॅक्लीन फर्नांडीस सुपर एक्साइटमेंटमध्ये खरं बोलून गेली. 


काय बोलली जॅक्लीन?



जॅक्लीनला विचारलं की, जर अनुष्का आणि विराटचं लग्न होतं असेल तर काय शुभेच्छा देशील? त्यावेळी जॅक्लीन स्वतःला रोकू शकली नाही. आणि तिने आनंदाच्या उत्साहात डान्स करून सांगितलं की, मी भरपूर एक्साइटेड आहे. माझ्या माहितीनुसार ही सगळ्यात अमेझिंग गोष्ट आहे. मी विराट आणि अनुष्कासाठी भरपूर खूष आहे. आणि आता मी यासाठी जास्त वाट पाहू शकत नाही. 


त्यावेळी पत्रकाराने जॅक्लीनला विचारलेल्या दुसऱ्या प्रश्नामुळे ती भानावर आली. आणि तिला अंदाज आला ही आनंदाच्या भरात मी बरचं काही बोलून गेली आहे. त्यानंतर तिने विराट - अनुष्काच्या लग्नाबद्दल एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. तसेच या प्रश्नाबद्दल अभिनेत्री कतरिनाला विचारलं तर तिने हसून या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. आपल्याला माहितच आहे अनुष्काचा बॉलिवूडमध्ये मोठा मित्र परिवार आहे. त्यामुळे कुणाकडून या लग्नाची पक्की माहिती मिळते का यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील आहे. 


आणि यातच जॅक्लीनने अतिउत्साहात सगळ्या गोष्टी सांगून टाकल्या आहेत.