मुंबई :  बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री  जॅकलीन फर्नांडिस सध्या तुफान चर्चेत आहे. रंगणाऱ्या चर्चांमागे कारण देखील तितकचं तगडं आहे. बॉलिवूडचा सेलेब्रिटी  फोटोग्राफर डब्बू रतनानीसाठी  (Dabboo Ratnani) आतापर्यंत अनेक अभिनेत्री टॉपलेस झाल्या. आता डब्बूसाठी जॅकलीन टॉपलेस झाली आहे. फोटोमध्ये जॅकलीनचा  बोल्ड आणि हॉट अंदाज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खुद्द डब्बूने हे फोटो त्याच्या सोशल मीडिया एकाउंटवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये  जॅकलीन स्वतःला चादरीत लपवताना दिसत आहे. जॅकलीनने तिच्या अकाउंटवर देखील फोटो पोस्ट केले आहेत. एवढंच नाही तर फोटो शेअर करत डब्बूने कॅप्शनमध्ये, 'रोज सकाळी लवकर उठा. कारण जेव्हा इतर स्वप्न बघत असतील तेव्हा तुम्ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी मार्ग शोधत असाल.'


जॅकलिनच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ती लवकरचं 'भूत' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. गुरूवारी चित्रपटाता पहिला लूक प्रदर्शित केला आहे.