जॅकलिन या विषयावर बोलतांना भावूक होते तेव्हा...
जेव्हा जॅकलिन होते भावूक...
मुंबई : बॉलिवुड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही, मुळची श्रीलंकेची काही दिवसापुर्वी जॅकलिने भारतीय लोकांसोबत तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. जॅकलिनने सांगितलं की, श्रीलंका आजही पर्यटनासाठी सुरक्षित आहे. जॅकलिनच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की, जॅकलिनच्या मनात श्रीलंकेबद्दल खुप जास्त प्रेम आहे. ज्या मातृभूमीत जन्म घेतला त्यावर प्रेम असणारचं, असं बोलतांना जॅकलिन भावूक सुध्दा झाली होती.
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने म्हटले आहे. श्रीलंका पर्यटनासाठी चांगला देश आहे. श्रीलंका हा देश स्वर्गासारखा आहे. पण काही दिवसापुर्वी म्हणजेच दोन महिन्यापुर्वी श्रीलंकेत इस्टरच्या दिवसात चर्च आणि लग्जरी हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता, यावर जॅकलिनने तिच्या भावाना व्यक्त केल्या आहेत.
सोमवारी जॅकलिन टुरिझमच्या प्रचारासाठी आली असतांना ती म्हणाली, टुरिझममध्ये खुप काळापासून श्रीलंका अव्वल देश होता आणि मला या गोष्टीचा फार जास्त गर्व आहे. सोबतच भारत सुद्धा जास्त प्रमाणात श्रीलंकेला पर्यटक देत असतो.
जॅकलिनने म्हटलं आहे की, मला एका गोष्टीचं फार जास्त वाईट वाटतं, ते म्हणजे जेव्हापासून श्रीलंकेवर दहशतवादी हल्ला झाला, तेव्हापासून पर्यटकांच्या संख्येत फार मोठी घट झाली आहे.
श्रीलंका आजही पर्यटनासाठी सुरक्षित आहे. हा संदेश लोकापर्यत पोहचविणं गरजेचं आहे. श्रीलंकेमधील दहशतवाद्याचे जाळे देशाने फार लवकर उध्वस्त केले आहे. जॅकलिनच्या म्हणण्यानुसार श्रीलंकाने खूप भयानक हल्ल्याचा सामना केला, मात्र आजही श्रीलंका तितकाच सुरक्षित देश आहे.