Dear me... ईडी प्रकरणात अडकल्यानंतर Jacqueline Fernandez ची लक्षवेधी पोस्ट
या पोस्टमध्ये तिने स्वतःला उद्देशून काही शब्द शेअर केले आहेत.
Jacqueline Fernandez ED Case : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस Jaqueline Fernandez वर 200 कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी दिल्ली येथे ईडी चौकशी सुरू झाली आहे. त्याच पार्श्वभुमीवर आता ईडीच्या रडारवर आलेल्या जॅकलिनने आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून एक स्टोरी शेअर केली आहे ज्यात तिने आपल्यावर उठलेल्या या कारवाईच्या दृष्टीकोनातून एक सकात्मक पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये तिने स्वतःला उद्देशून काही शब्द शेअर केले आहेत. तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, प्रिय मी, मला आयुष्यात चांगल्या गोष्टी मिळण्यास मी पात्र आहे. मी खंबीर आहे. मी माझ्या आयुष्यात चांगलं काम करणार असून मी माझी ध्येय आणि उद्दिष्ट्ये पुर्ण करणार आहे.
ही पोस्ट तिने एका इन्टाग्राम पेजवरून घेतली आहे. ती तिने तिच्या स्टोरीमध्ये रिपोस्ट केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ही पोस्ट तिने कालच शेअर केल्याचं समोर आलं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात (Exotrotion Case) ईडीने जॅकलिनवर आरोप करण्यात आले आहेत. ईडी जॅकलिनविरोधात चार्जशीट दाखल करणार असल्याची बातमी समोर आली होती. या ईडी प्रकरणात जॅकलिनची चौकशी झाल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी ती सुकेश चंद्रशेखरच्या खंडणी प्रकरणात आरोपी असल्याचे समोर आले आहे.
सुकेश चंद्रशेखर याने जॅकलिन आणि तिच्या कुटुंबियांना महागड्या वस्तू आणि कार भेट दिल्या आहेत. आत्तापर्यंत जॅकलिनची 7 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. नुकत्याच काही महिन्यांपुर्वी हे प्रकरण लोकांसमोर आले होते आता पुन्हा एकदा या प्रकरणाे डोकं वर काढले आहे.