मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस महाठग सुकेश चंद्रशेखरसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. तिचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत सुकेश चंद्रशेखर किस करताना दिसत आहे. फोटोमध्ये सुकेश जॅकलीन फर्नांडिसच्या गळ्यावर लव्हबाईट देताना दिसत आहे.  हा फोटो व्हायरल झाल्यानंतर जॅकलीनने सोशल मीडियावर तिचं वक्तव्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॅकलीनने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर ही माहिती दिली आहे. अभिनेत्रीने लिहिलं की, 'या देशातील जनतेने मला नेहमीच प्रेम आणि आदर दिला आहे. यामध्ये माझ्या मीडिया मित्रांचा समावेश आहे ज्यांच्याकडून मी खूप काही शिकले आहे.


मी सध्या कठीण काळातून जात आहे पण मला आशा आहे की, माझे मित्र आणि चाहते माझ्यासोबत असतील. मी माझ्या सर्व मीडिया मित्रांना विनंती करू इच्छिते की, अशाप्रकारे माझे कोणतेही फोटो प्रसारित करू नका, कारण त्याचा माझ्या गोपनीयतेवर परिणाम होतो. तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत किंवा अगदी जवळच्या व्यक्तींसोबत हे करणार नाही. मला आशा आहे की, तुम्ही हे करणार नाही. माझा न्यायावर विश्वास आहे आणि मलाही तो मिळेल अशी आशा आहे. धन्यवाद.'



किस करतानाचा फोटो व्हायरल 
सुकेश चंद्रशेखरसोबत जॅकलिनसोबतचा एक खासगी फोटो लीक झाला होता. या फोटोमध्ये सुकेश जॅकलीनला किस करताना दिसत आहे. यासोबतच जॅकलीनच्या मानेवर लव्ह बाईट स्पष्ट दिसत आहे. फोटोत अभिनेत्रीने प्रिंटेड टॉप घातला आहे.