श्रीलंका : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ही मूळची श्रीलंकेची पण अल्पावधीतच जॅकलीनने बॉलिवूडमध्ये आपला जम बसवला आहे. 


इंस्टाग्रामवर शेअर केला खास व्हिडिओ  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसने इंस्टाग्रामवर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये जॅंकलीनच्या हातामध्ये चक्क एक जीवंत आहे. सापाला हातामध्ये पकडून स्थानिक अधिकार्‍यांशी बोलतानाचा, सापाबद्दल कुतुहलाने काही प्रश्न विचारताना दिसत आहे.  



 


श्रीकंलेच्या जंगलात रमली जॅकलीन  


श्रीलंकेच्या एका रेस्कयू आणि रिहॅबिटेशन सेंटरमध्ये जॅंकलीन गेली होती. तेथे ती सापाबद्दल माहिती घेतानाचा व्हिडिओ फारच गाजला आहे. सुमारे अडीच लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.  


'रेस 3' मध्ये झळकणार जॅंकलीन 


अभिनेत्री जॅंकलीन फर्नांडिस सलमान खानसोबत 'रेस 3' या चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटामध्ये जॅंकलीन पुन्हा सलमानसोबत दिसणार आहे. यंदा 15 जूनला हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. 2009 साली अ‍ल्लाउद्दीन या चित्रपटातून जॅकलीन आणि रितेश देशमुख ही जोडी एकत्र दिसली होती.  लवकरच ती 'किक 2' मध्येही झळकणार आहे.