तुम्ही स्वप्नातही विचार करू शकणार नाही, इतक्या महागड्या गिफ्ट्सची Jacqueline होती मालकीण, वाचा तिला सुकेशकडून काय काय मिळालं?
कोट्यावधींची किंमत असणारे महागडे गिफ्ट्स सुकेशने जॅकलिनला दिले होते.
Jacqueline Fernandez Gifts: बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नार्डिस सध्या ईडीच्या रडारवर आहे. 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात तिला आरोपी ठरवण्यात आले आहे. सुकेश चंद्रशेखरच्या मनी लाँड्रिंग घोटाळ्यात जॅकलिन पुर्णतः अडकली आहे. परंतु सुकेश चंद्रशेखरकडून जॅकलिनला मिळालेल्या संपत्तीची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. कोट्यावधींची किंमत असणारे महागडे गिफ्ट्स सुकेशने जॅकलिनला दिले होते.
समोर आलेल्या माहितीनुसार असे कळते की सुकेशने फसवणूक करून मिळवलेल्या पैशातून जॅकलिनला 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या भेटवस्तू दिल्या होत्या. असे कळते की सुकेशची सहकारी पिंकी इराणी हिने या सगळ्या महागड्या भेटवस्तू जॅकलिनपर्यंत पोहचवल्या होत्या.
वाचा जॅकलिनला मिळालेल्या भेटवस्तूंची यादी : जॅकलिनला मिळालेल्या महागड्या भेटवस्तूंमध्ये 52 लाख रुपये किमतीचा अरबी घोडा, प्रत्येकी 9 लाख रुपये किमतीच्या तीन पर्शियन मांजरी, डिझायनर कपडे आणि जिम वेअर, गुच्ची आणि शनेल या ब्रँन्डच्या डिझायनर बॅग, लुई व्हिटॉनचे शूज आणि हर्मीसचं ब्रेसलेट यांचा समावेश आहे.
असेही कळते की तिला सेंट लॉरेंट आणि डायर या ब्रँन्डकडून महागडी बॅग, लई व्हिटॉन आणि लुबाऊटिनचे तीन शूट, गुच्ची ब्रँडचे कपडे, परफ्यूम्स, हिऱ्यांचे कानातले, डायमंड ब्रेसलेटही गिफ्ट्समधून मिळाले आहे. त्यातूनही मोठं गिफ्ट म्हणजे जॅकलिनला एक मिनी कूपरही सुकेशने गिफ्ट केले होते जो तिने परत केला.
जॅकलिन फर्नांडिसच्या कुटुंबासाठीही सुकेशकडून भेटवस्तू ः समोर आलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखरने तिच्या कुटुंबावर भेटवस्तूंचा वर्षावही केला. अमेरिकेत राहणाऱ्या जॅकलिनच्या बहीणीला त्याने USD 1,73,000 चे कर्ज दिले होते. त्याने तिच्या भावाला बीएमडब्ल्यू कार, रोलेक्सचे घड्याळ आणि 15 लाखांचे कर्जही दिले.
सुकेश आणि जॅकलिन चेन्नईमध्ये फक्त दोनदा भेटले अशी माहिती समोर आली आहे. ते सहा महिन्यांपासून मोबाईलवरून संपर्कात होते. फेब्रुवारी 2021 ते ऑगस्ट 2021 या कालावधीत त्यांचे फोनवर बोलणे झाले असल्याचे समोर आले आहे.
नोरा फतेहीसुद्धा सुकेशच्या जाळ्यात: सुकेशने तिला महागडी बीएमडब्ल्यू एस कार भेट दिल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी तिलाही ईडीकडून समन्स बजावले होते.