मुंबई :  'अलादीन' या चित्रपटातून बॉलिवूड करिअरची सुरुवात करणारी जॅकलीन फर्नांडीस हे आज खूप मोठं नाव बनलं आहे. जॅकलीन शेवटची सलमान खानसोबत रेस 3 या चित्रपटात दिसली होती. पण तुम्हाला माहित आहे का? सलमान आणि जॅकलिनची पहिली भेट कशी झाली आणि 'दबंग खान' काय म्हणाला होता...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2006 मध्ये मिस युनिव्हर्स श्रीलंका खिताब जिंकल्यानंतर जॅकलिन फर्नांडिस 2009 मध्ये मॉडेलिंग शोसाठी भारतात आली होती. अशा परिस्थितीत तिने रितेश देशमुख आणि अमिताभ बच्चन स्टारर अलादीनसाठी येथे ऑडिशन दिलं आणि तिची निवड झाली. जॅकलिन फर्नांडिसचा हा बॉलिवूड डेब्यू चित्रपट आहे.


सलमान खानसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगताना जॅकलिन म्हणाली, 'मला माहित आहे की मी खूप हसते. जेव्हा मी सलमान खानला पहिल्यांदा भेटले तेव्हाही मला हसायला आलं होतं आणि तो म्हणत होता की तुझं नाव 'मुस्कान' असावं.


याचबरोबर आम्ही तुम्हााला सांगतो की, सलमान खानचा ‘बिबी हो तो ऐसी’ हा चित्रपट 1988 मध्ये आला होता. तेव्हा सलमान सोबत ‘किक आणि रेस 3’ सारख्या चित्रपटात अभिनय करणारी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ही फक्त तीन वर्षाची होती. जॅकलीन फर्नांडिस चा जन्म 11 ऑगस्ट 1985 रोजी झाला होता.


 


पण सध्या जॅकलिन फर्नांडिज सलमान खानची नायिका म्हणून ओळखली जाते. एवढंच नाही तर त्यांची मैत्री कोणापासूनच लपून नाही. कोव्हिड काळात जॅकलीन सलमानच्या फार्महाऊसवरही राहत होती.   जॅकलीन फर्नांडिसने रितेश देशमुख सोबत अलादीन या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.


पण या चित्रपटांमधून तिला फारशी ओळख भेटली नाही. त्यानंतर जॅकलीनला इम्रान हाश्मीसोबत मर्डर 2 चित्रपटात काम करताना दिसली आणि त्यानंतर जॅकलीन फर्नांडिस रातोरात स्टार झाली. कारण त्या चित्रपटांमध्ये तिने उत्तम अभिनय केला होता आणि त्यामुळे ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.