मुंबई : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सिद्धार्थ मल्होत्रासह आगामी 'जेन्टलमेन: सुंदर,सुशील, रिस्की' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील 'चंद्रलेखा' हे गाणं गुरूवारी रिलीज केले आणि ते गाणं लोकांना खूपच आवडले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या गाण्यात सिद्धार्थ मल्होत्रा एका गायकाच्या अंदाजात तर जॅकलिन ही पोल नृत्य करताना दिसतेय. हे गाणं आदिल शेख यांनी दिग्दर्शित केले आहे.
 
नृत्यदिग्दर्शक आदिल शेख यांच्या मते, जॅकलिन ही एक प्रतिभावंत अभिनेत्री आहे. मी या आधी कधीच तिच्या सोबत काम केलं नव्हतं. तिच्यातील सर्वोत्तम गोष्ट म्हणचे तिचा सराव. तिने या डान्ससाठी खूपच मेहनत घेतली, असे आदिल शेख यांनी सांगितले. 
 


'कर गई चूल' या गाण्याला पुरस्कार


नृत्यदिग्दर्शक आदिल शेख यांना 'कर गई चूल' या गाण्यासाठी पुरस्कार मिळाला आहे.