`जागो मोहन प्यारे` नव्या वेळेत
झी मराठी वाहिनीवरील जागो मोहन प्यारे या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आलाय.
मुंबई : झी मराठी वाहिनीवरील जागो मोहन प्यारे या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आलाय.
आतापर्यंत ही मालिका बुधवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येत होती. मात्र आता या वेळेत बदल करण्यात आलाय.
21 मार्चपासून तुमच्या लाडक्या मोहन आणि भानूला बुधवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता भेटता येणार आहे. या वाहिनीवरील 'गाव गाता गजाली' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय.
य़ा मालिकेच्या जागी 'ग्रहण' ही मालिका सुरु होत असून १९ मार्चपासून सोम ते शनिवार रात्री १०.३० वाजता ग्रहण सुरु होणार आहे. यामुळेच 'जागो मोहन प्यारे' या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आलाय.
'ग्रहण' या मालिकेच्या निमित्ताने पल्लवी जोशी बऱ्याच काळानंतर झी मराठीवर परततेय.