`35 शी ओलांडली... अजून लग्न नाही, कसं होणार?` जुई गडकरीनं केला कठीण काळाविषयी खुलासा
Jai Gadkari : जुई गडकरीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लग्नावर वक्तव्य केलं आहे.
Jai Gadkari : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी ही तिच्या अप्रतिम अभिनयासाठी ओळखली जाते. 'पुढंच पाऊल' या मालिकेतील कल्याणी भूमिकेमुळे जुई घराघरात पोहोचली. जुईचे लाखो चाहते आहेत. जुई चर्चेत असण्याचं एक वेगळंच कारण आहे. जुईनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या गंभीर आजाराविषयी आणि त्यामुळे तिला मुलं होणार नाही असं सांगितलं. त्याशिवाय 35शी ओलांडल्यानंतरही लग्न नाही झालं तर पुढे कसं होणार या सगळ्या प्रश्नांवर जुईनं स्पष्ट वक्तव्य केलं आहे.
जुईनं ही मुलाखत 'लोकमत फिल्मी' युट्यूब चॅनलला दिली. या मुलाखतती सुरुवातीला जुई म्हणाली जेव्हा तिला तिच्या आजाराविषयी कळलं. त्यानंतर तिला काय वाटलं याविषयी सांगत जुई म्हणाली, 'मी माझ्या पायावर पुन्हा उभी राहू शकेन की नाही मला याची गॅरेन्टी नव्हती. त्यासाठी मी अॅक्टिंगच्या युनियनची कार्ड असतात. ते कार्ड आम्हाला दरवर्षी रिन्यू करावी लागतात. मी ते कार्डही रिन्यू केलं नव्हतं. कारण माझं असं झालं होतं की जर मी जिवंतच राहिले नाही तर ते कार्ड रिन्यू करून काय करु.'
पुढे जुई म्हणाली की 'एका पॉइंटला ठरवलं स्वत: शी कारण आपण रोज या गोष्टींवर रडू शकत नाही. जर आपण रडत बसलो तर आपली बॉडी अजून निगेटिव्हली रिस्पॉन्स करु लागते. मग आपली बॉडी स्वत: ला जास्त त्रास करुन घेते. त्यानं काय होतं की पुढे जाऊन काही चांगल होणार असेल तर त्याही होत नाहीत. मी रड-रडले आणि जो त्रास करुन घ्यायचा होता तो करुन घेतला आणि एका पॉइंटला ठरवलं की बास.. आज रडलीये नंतर या गोष्टीसाठी मी नाही रडणार.'
लग्नाविषयी जुई म्हणाली...
'मी रोज हा प्रश्न फेस करते की लग्न नाही झालं. बापरे पुढे कशा काय होतील गोष्टी. तर माझं एका पॉइंटला असं झालं ना की ठीक आहे. उशिर झाला, मान्य आहे मला. याच्या पुढे माझं लग्न होऊन मुलं बाळं कधी... हे सगळेही प्रश्न माझ्याही डोक्यात रोज येतात. पण त्याच बरोबरना माझ्या आयुष्यात कुठल्या पॉजिटिव्ह गोष्टी आहेत ते देखील पाहते. मी जसं नेहमी म्हणते की जसा माझा देवावर विश्वास आहे. ज्या काही गोष्टी आजपर्यंत घडल्या आहेत त्या त्याच्या मर्जीनुसार घडल्या आहेत. त्यामुळे माझं लग्न आणि मुलं हे सुद्धा त्याच्या मर्जीनेच होणार. जेव्हा ते त्याच्या मर्जीनं होतं तेव्हा ते सगळ्यात चांगलं असतं. तुमच्याही आयुष्यात अशा काही गोष्टी असतील... अडथळे येत असतील. तर ठीक आहे त्याचा स्वीकार करा. कारण तुमच्या आयुष्यात पॉजिटिव्ह गोष्टीही तितक्याच असतील. त्यांच्याकडे लक्ष द्या आणि हळूहळू सगळं सांभाळा. नुसतं प्रेशर घेऊ नका त्याकडे की बाबा कधी होणार कसं होणार.'
हेही वाचा : 'सर्कसमधल्या स्टंटमुळे सलीम खान यांनी लगावली सलमान खानच्या कानशिलात! अरबाज म्हणाला...
पुढे जुई म्हणाली, 'मला पुर्वीच्या एकाबाबतीत गोष्टी पटायच्या की वेळेत लग्न, वेळेत मुलं-बाळ, वेळेत सगळं, तुम्ही वेळेत सेटल होता. ही गोष्ट तेव्हाच्या काळासाठी चांगली होती. आता मुलींना बाहेरपडून जितका स्ट्रेस येतो किंवा आपली लाइफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या पद्धती आहेत. त्यामुळे तुमच्यातील वंध्यत्व वाढणं आणि ते ही खूप लवकर आणि कमी वयात वाढणं. हा सगळ्यात मोठा प्रॉबलम असून मुला-मुली दोघांनाही होतो. त्यासाठी मुलींना खूप प्रेशर येतं. कारण आपल्याकडे कसं आहेना, स्त्री ही तेव्हाच पूर्ण होते जेव्हा तिला मुल बाळ होतं. हे आपल्याकडे मानलंच जातं. मग त्या स्त्रीयांनी काय करायचं ज्यांना मुलं होऊ शकत नाही किंवा त्यांना नकोय. मग ती स्त्री नाही का? तर तसं नाही आहे. या गोष्टीतर मी खूप ऐकल्या आहेत. आता काय 30 शी ओलांडली आता काय... मला तर आता म्हणतात 35 शी ओलांडली. कधी लग्न करणार वगैरे. तर माझं असं होतं की हो होईल. माझी तर परिस्थितीच वेगळी आहे. माझा प्रॉबलमच वेगळा असल्यामुळे मी समजावते आता सगळ्यांना. या सगळ्यात चांगली गोष्ट माझं कुटुंब माझ्यासोबत आहे. जर तुमचं कुटुंब तुमच्यासोबत असेल ना तर तुम्हाला इतरांच्या बोलण्याचा त्रास होत नाही.'