Sana Khan Baby Boy News: बॉलिवूडमध्ये अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या घरी येणाऱ्या गुडन्यूजबद्दल सोशल मीडियावर सांगताना दिसत आहेत. सध्या अशाच एका अभिनेत्रीनं एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. तिनं सोशल मीडियावरून याबद्दलची एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं आपल्याला गोंडस बाळाच्या जन्माची गुडन्यूज शेअर केली आहे.  यावेळी तिनं एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तिनं कॅप्शनही लिहिलं आहे. सना खान ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. सलमान खानच्या जय हो या चित्रपटातून तिनं सलमान खानच्या हिरोईनची भुमिका केली होती. तिच्या या पोस्टखाली अनेक कमेंट्स येताना दिसत आहेत. तिच्या अनेक चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री सना खाननं आपल्याला गरोदरपणी झालेल्या त्रासाबद्दलही अनेकदा बोलताना दिसते आहे. मध्यंतरीही तिनं आपल्याला झालेल्या या त्रासाबद्दलही सांगितले होते. ती म्हणाली की, माझी रात्रीची झोप उडाली होती. मला गरोदरपणामुळे अजिबातच झोप येत नाहीये. जर मला झोप लागलीच तर मी उशिरा उठायचे. मला माहिती नाही की सर्वांनाच असाच त्रास होत असेल की नाही. मला अनेकदा सकाळी झोप येयाची. त्यामुळे मला तेव्हा प्रश्न पडायचा की मी झोपू की नाही. तेव्हा विचार येतो की मी फारच आळशी झाली आहे का? 


हेही वाचा - Khupte Tithe Gupte: नितीन गडकरींना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय खुपतं? एका वाक्यात म्हणाले...


त्याचसोबत ती म्हणाली की, मी माझ्या गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसांमध्ये होते. तेव्हा मी खूप आनंदी होते. सोबतच खूप उत्साहितही होते आणि घाबरलेलीही होती. हे सर्व माझ्या मनात येणाऱ्या भावना होत्या. जे नव्यानं आई होण्याची प्रोसेस आजमावतात त्यांना याबद्दल नक्कीच माहिती असेल. मी माझ्या बाळाला पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. पाहायचे आहे की पुढे सर्व कसं होतंय. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कोण आहे सना खान? 


सना खान ही अभिनेत्री 2020 पासून बॉलिवूडमधून ब्रेक घेतला आहे. तिनं बिजनेसमन मुफ्ती अनस सैय्यदसोबत निकाह केला आहे. 2017 साली ते दोघं मक्का येथे भेटले होते. तिनं टॉयलेट एक प्रेमकथा, स्पेशल ऑप्स अशा चित्रपटांतून तिनं कामं केली आहेत. त्यासोबत ती बिग बॉसमध्येही दिसली होती. सना खान ही इन्टाग्रामवरही सक्रिय आहे त्यामुळे तिची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगताना दिसते. आता तिच्या या गुडन्यूजनं चाहत्यांनाही आनंद झाला आहे.