jai jai swami samarth : 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले कलाकार आता त्यांच्या मनात आणि घरात पोहोचले आहेत. स्वामी समर्थांची महती सांगणाऱ्या या मालिकेतून त्यांचे काही परमभक्तही प्रेक्षकांना पाहता आले. त्यांचीही ख्याती घराघरात पोहोचली. यातलीच एक परमभक्त म्हणजे चंदा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेहऱ्यावर भीती, मनात सतत स्वामींच्या नावाचा जप आणि येणारी प्रत्येक अडचण स्वामी पाठिशी उभे राहून दूर करतील असा तिचा विश्वास ही चंदाची ओळख ठरली. (jai jai swami samarth fame actress vijaya babar shared qhuck make up video)


अभिनेत्री विजया बाबर, हिनं ही भूमिका अतिशय लिलया पेलली. तिन इतक्या सुरेखपणे ही भूमिका साकारली, की चंदाला काही अडथळा आला की इथं प्रेक्षकांच्या मनातही घालमेल होते. 


अशी ही चंदा प्रत्यक्ष आयुष्यात बरीच वेगळी आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक नजर टाकल्यास याचा लगेचच अंदाज येत आहे. मालिकेच्या निमित्तानं परकर - पोलकं आणि आता नऊवारी साडीमध्ये दिसणारी 'चंदा' म्हणजेच विजया प्रत्यक्ष आयुष्यात क्रॉप टॉप, हायवेस्ट जीन्स अशा लूकमध्ये दिसते. 


विजयानं नुकताच एक व्हिडीओही शेअर केला आहे. जिथे ती क्षणातच सुरेख असा मेकअप करताना दिसत आहे. बाहेर जायला निघालं असता घाईगडबडीत मेकअप स्कीप न करता तो पटकन करा उरकावा हे विजया तिच्या इन्स्टा रीलमधून दाखवताना दिसत आहे. 



मेकअपच्या बेसपासून लिपस्टीक आणि मस्कारापर्यंत, बरं लहानशी चूक होण्यापासून ती सुधारेपर्यंतच्या Tricks हे सर्वकाही विजया या व्हिडीओमध्ये दाखवताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओला हजारो लाईक्स मिळाले आहेत. तर फॉलोअर्सनी त्यावर कमेंटही केल्या आहेत. तुम्हाला कशी वाटली ही स्टायलिश विजया?