Jaydeep Ahlawat on Alia Bhatt: सध्या ओटीटीचं माध्यमं हे अधिक प्रभावशाली आहे. यातून पुढे येणारे अभिनेते किंवा अभिनेत्री यांच्या लोकप्रियतेत अधिक वाढ होताना दिसते आहे. यावरून त्यांची लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढतानाही दिसते. सध्या अशाच एका अभिनेत्याची चर्चा आहे. खरंतर कुठलाही चित्रपट करणं हे कोणत्याही अभिनेत्यासाठी, अभिनेत्रीसाठी सोप्पं नाही. त्यातून अशावेळी एखाद्या सत्यघटनेवर किंवा त्याच्याशी संबंधित एखाद्या विषयावर जरा का चित्रपट करायचा असेल तर त्याच्या अनुभवातून त्याला जावेच लागते. अशाच एका लोकप्रिय अभिनेत्यानं यावेळी आपला एक थरारक अनुभव सांगितला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयदीप अलहावत याची जोरदार चर्चा रंगलेली होती. त्याचा यावर्षी 21 सप्टेंबरला प्रदर्शित झालेला 'जाने जान' हा चित्रपट बराच गाजला होता. या चित्रपटातून अभिनेत्री करीना कपूर हिनं ओटीटीवरून पदार्पण केले होते. त्यामुळे या चित्रपटाची बरीच चर्चा ही रंगलेली होती. या चित्रपटातून जयदीप अलहावत, करीना कपूर, विजय वर्मा यांच्याही भुमिका होत्या. त्यांच्या भुमिकांचीही प्रचंड चर्चा रंगलेली होती. आता चर्चा आहे ती म्हणजे जाने जान या चित्रपटातील त्याचा को-स्टार सौरभ सचदेवा याला दिलेल्या मुलाखतीत त्यानं 'राझी' चित्रपटाची एक आठवण सांगितली आहे. यावेळी त्यानं सांगितलं आहे की त्याला फारच 


खरंतर हे खूपच सामान्य असायला हवं तुम्हाला तुमच्या कामावरून फार त्रास होतो आहे. माझ्यासाठी, काहीसं असं होतं. मला तर वाईट स्वप्नंही पडायला लागली होती. जेव्हा मी राझी हा चित्रपट केला तेव्हा पहिल्यांदा मला याचा अनुभव आला होता. मला अशाप्रकारे कधीच वाईट स्वप्नं पडतं नव्हती. हे जगं खूप वेगळं आहे. मी या हेरगिरीच्या विषयाबद्दल ऐकलं तेव्हा मला फारच भीती वाटली. स्पाय असणं काही कठीण नाही. मी तर कधी याबद्दल ऐकलंही नव्हतं. माझ्या आयुष्यात हे पहिल्यांदाच घडलं होतं. मी तर या सर्व वाईट स्वप्नांमुळे खूपच घाबरले होते. मला तर स्वप्नात असं दिसायचं की लोकं बंदुका, गोळ्या आणि बॉम्बपासून आपला जीव वाचवत पळत आहे. 


हेही वाचा : 


त्यावेळी तो म्हणाला की या चित्रपटातलं कामं त्यानं फार पाहिलंही नाही. 80 टक्के त्यानं त्याचं काम हे पाहिलेलं नाहीये. तो पुढे म्हणाला की, मी राजी हा चित्रपट पाहिला कारण मेघना (दिग्दर्शिका मेघना गुलझार) आणि आलिया भट्ट यांनी माझा नंबर ब्लॉक करायची धमकी दिली होती. मी चौथ्या स्क्रीनिंगसाठी गेलो होतो.