Janhavi Kapoor Mili Interview: जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या निमित्तानं चर्चेत आहे. तिच्या या चित्रपटाची जोरदार चर्चा होते आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला असून या चित्रपटाच्या ट्रेलरला सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत आहेत. मिलीमधून रहस्यमय कथा प्रेक्षकांच्यासमोर येणार आहे. ट्रेलरमध्ये आपण पाहू शकतो की (Janhavi Kapoor Milli Tralier) जान्हवी प्रचंड थंडीत वेगवेगळ्या घटनांना सामोरी जात आहे. (janhavi kapoor milli shares experience on her set know what she says)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटातून सस्पेन्स ड्रामा चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. तेव्हा आपल्या या शूटिंगच्या अनुभवांबद्दल सांगताना जान्हवीनं नुकतीच एक (Janhavi Kapoor Recent Interview) मुलाखत दिली आहे. आपल्या अनुभवांबद्दल सांगताना तिनं सेटवरचे अनेक किस्से शेअर केले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार या चित्रपटात काम करणं तिच्यासाठी तितकं सोप्पं नव्हतं. तिला अनेक समस्यांनाही सामोरं जावं लागलं आहे. शूटिंगनंतर जान्हवीची प्रकृतीही बिघडली होती. (Janhavi Kapoor Shooting Experience)


आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'


-10 डिग्री तापमानात केलं शूटिंग? 
जान्हवी कपूरने सांगितले की, या चित्रपटाचे शूटिंग -10 डिग्री तापमानात करण्यात आले आहे. यासाठी एक मोठा फ्रीज बनवला होता, ज्यात बसून तिला संपूर्ण शूट करायचं होतं. दिग्दर्शकाने तिला काही टिप्सही दिल्या होत्या आणि तिला जसं कम्फर्टेबल वाटतंय तसं राहावं असं त्यांनी तिला सांगितलं होतं. पण इतक्या कमी तापमानात शूटिंग करणं सोपं नक्कीच नव्हतं. शॉट दिल्यानंतर आपली प्रकृती बिघडायची, अशी माहिती तिनं दिली.  


आणखी वाचा - गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी... पाहा फायदे


जान्हवीला मिळाली रिमेक चित्रपटाची ऑफर? (South Indian Movie Remake)
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतून जान्हवीनं सांगितलं की तीही लवकरच एका साऊथ इंडियन चित्रपटांच्या रिमेकमध्ये दिसू शकते. जान्हवीचे वडील बोनी कपूर (Bonney Kapoor) हे स्वतः बॉलिवूडचे निर्माते आहेत. आतापर्यंत त्यांनी नऊ साऊथ चित्रपटांचे हिंदीत रिमेक केले आहेत. आता आपल्या मुलीसाठीही ते अशाच एका चित्रपटाची निर्मिती करत असल्याचे त्यांनी सांगितले.