Khushi Kapoor Comment : बॉलीवूडचे स्टार कीड्स हे सतत चर्चेत असतात. त्यांच्या लव्ह अफेअर्सपासून ते त्यांच्या लाईफस्टाईलपर्यंत सगळ्याच गोष्टींबद्दल त्यांच्या चाहत्यांना त्यांचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतात. तेही सतत त्यांच्या चाहत्यांसोबत आपले नवनवीन अपडेट्स शेअर करत असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यातूनही सध्या कपूर स्टार कीड्स हे प्रेक्षकांच्या सतत निशाण्यावर असतात. त्यातील एक बहिणींची जोडी म्हणजे खुशी कपूर आणि जान्हवी कपूर ही. खुशी कपूर लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे खुशी कपुर सध्या भलतीच चर्चेत आहे. खुशीने नुकतेच इन्टाग्रामवर आपले बोल्ड फोटोज शेअर केले आहेत. त्यावर बहीण खुशी कपूर हिने शेअर केलेली कमेंट चाहत्यांचे लक्ष वेधून घेते आहे. 


आपल्या कमेंटमधून जान्हवी मात्र फार इमोशनल झालेली दिसते आहे. त्यातून आपल्या या फोटोवर बहीणीने केलेल्या कमेंटवर रिप्लाय देताना खुशीही इमोशल झाल्याचे दिसते आहे. 


काय आहे जान्हवीची कमेंट - जान्हवी कपूर आणि खुशी कपूर एकमेकांनी खूपच मिस करताना दिसत आहेत कारण जान्हवी कपूरने खुशीच्या फोटोवर कमेंट करताना म्हटले आहे ''Excuse me'' आणि त्याचसोबतच चार पाच इमोशनल इमोजीही शेअर केले आहेत. त्यावर खुशीने केलेला रिप्लायही इमोशनल आहे. जान्हवीला रिप्लाय देताना ती म्हणते, ''miss you''. दोघींच्या संभाषणावरून असे लक्षात येते की त्या दोघी एकमेकांनी मिस करतायत आणि जान्हवी किंवा खुशी शुटिंगच्या निमित्ताने कुठेतरी गेली आहे. 



'या' चित्रपटातून खुशी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे... 
खुशी कपूर झोया अख्तर दिग्दर्शित 'आर्चीज' या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमधून चित्रपट जगतात प्रवेश करणार आहे. खुशी व्यतिरिक्त अमिताभ बच्चन यांची नात अगस्त्य नंदा आणि शाहरुख खानची मुलगी सुहाना खान देखील दिसणार आहे.