मुंबई : अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूनंतर आज तिचा पहिला वाढदिवस आहे. दुबईमध्ये एका हॉटेलात बाथटबमध्ये बुडल्याने श्रीदेवींचा मृत्यू झाला. पहिल्या सुपरस्टार अभिनेत्रीचा अशा अकाली मृत्यू होणं कपूर कुटुंबीयांसोबतच तिच्या चाहत्यांनाही चटका लावणारं होतं. 


जान्हवी कपूरने शेअर केली पोस्ट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जान्हवी कपूरने आज श्रीदेवींच्या मृत्यूपश्चात पहिल्या वाढदिवशी एक खास फोटो शेअर केला आहे. यामध्ये जान्हवी कपूर, बोनी कपूर आणि श्रीदेवीचा एकत्र फोटो आहे. जान्हवीचा बालपणीचा हा फोटो भावूक करणारा आहे. आज श्रीदेवीचा 55 वा वाढदिवस आहे. 



धडकद्वारा जान्हवीची बॉलिवूडमध्ये एंट्री 


जान्हवी कपूर काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. सैराट या सुपरहीट मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक असलेला 'धडक' हा सिनेमा बॉक्सऑफिसवर तुफान कामगिरी करत आहे. जगभरात बॉक्सऑफिसवर दमदार कामगिरी करणार्‍या 'धडक' मधून जान्हवीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण झालं आहे.