Janhavi Kapoor Trolled: जान्हवी कपूरची अनेकदा चर्चा रंगलेली असते. तिचे लव्ही डव्ही फोटो हे कायमच चर्चेत असतात. त्यामुळे सध्या अशाच काही फोटोंची सर्वत्र चर्चा रंगली आहे. यावेळी तिच्या फोटोंपेक्षा चर्चा आहे ती म्हणजे तिनं केलेल्या फोटो एडिटिंगची. फोटो एडिटिंग नाही तर फोटोशॉप. सध्या जान्हवी कपूरचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच होतो आहे. यामध्ये ती एका ठिकाणी पोझ देताना दिसते आहे ज्यामागे तुम्ही पाहु शकता की, ती एकेठिकाणी पोझ देऊन उभी आहे परंतु तिच्या पाठच्या सोफ्यानं सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. या फोटोत तिनं एक सुंदर असा फ्लोरल ड्रेस घातला आहे. ज्यात ती अत्यंत सुंदर दिसत असली तरीसुद्धा आपली ही लव्ही डवी फिगर दिसावी म्हणून तिनं चक्क फोटोशॉप केलेलं आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा तुमच्या आमच्यासारखे कॉमन मॅन हे आपलीही फिगर सेलिब्रेटींप्रमाणे दिसावी म्हणून फोटोशॉप करताना दिसतात. त्यासाठी अॅप्सवर प्रयोगही करताना दिसतात. त्यामुळे कोणीही सोशल मीडियावर आपला फोटो अपलोड केला तर प्रत्यक्षात जी एखादी व्यक्ती दिसते तशी मात्र ती फोटोत दिसत नाही. त्यामुळे अनेकांना अशा कमेंट्स येतात की हो बहुतेक हिनं/ह्यानं फोटोशॉपचं केलं आहे.


हेही वाचा - चर्चा तर होणारच! 3 मिनिटांच्या गाण्यासाठी 'ही' दाक्षिणात्त्य अभिनेत्री घेतेय 5 कोटींचं मानधन


सेलिब्रेटींच्या बाबतीत तुम्ही किंवा आम्ही असं काहीच म्हणणार नाही कारण यांच्या फीगर या कायमच चांगल्या वाटतं असतात आणि त्यामुळे त्यांच्या फोटोंवर कोणी असं म्हणणार नाही की काय हे तर फोटोशूट आहे. परंतु थांबा असं खरंच घडलं आहे. चक्क जान्हवी कपूर हिनं आपला एक फोटो फोटोशूट केला आहे ज्याचा पुरावा म्हणजे असाच एक फोटो सध्या व्हायरल होतो आहे. 



यावेळी स्पष्टपणे असं दिसतंय की, तिनं आपला हा फोटो एडिट केला आहे आणि त्यामुळे तो फोटो एडिट करता करता चक्क तिच्या बाजूला असलेली खुर्चीही एडिट झाली आहे. तिचा पाय तिरका झालेला वाटतो आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या फोटोची चांगलीच चर्चा आहे आणि त्याचसोबतच यावरून जान्हवी कपूरला चांगलंच ट्रोल केलं जातं आहे. सध्या तिचा आणि वरूण धवलचा बवाल हा चित्रपट 21 जूलैला प्रदर्शित होतो आहे. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा होताना दिसते आहे. या चित्रपटातून हे दोघं पहिल्यांदाच एका चित्रपटातून येणार आहेत.