मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर दर विकेंडला आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत पार्टीला जात असते. या विकेंडला सुद्घा ती आपल्या 'बॉयफ्रेंड' आणि मैत्रिणींसोबत पार्टीला निघालीय.मात्र यावेळी तिला मोठया गर्दीला सामोरे जावे लागले. या गर्दीतून बाहेर काढण्यात तिचा 'बॉयफ्रेंड' सुद्धा अपयशी ठरला होता. या संदर्भातला व्हिडिओ समोर आला आहे. 


व्हायरल व्हिडिओत, अनन्या पांडे, शनाया कपूर आणि कथित बॉयफ्रेंड ओरहान जान्हवी कपूरसोबत वीकेंडला पार्टीसाठी निघाल्याचे दिसतेय. यावेळी अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी व तिला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अशा परिस्थितीत जान्हवी कपूरला गर्दीतून वाचवण्यात ओरहानही अपयशी ठरला होता. यादरम्यान अभिनेत्रीच्या अंगरक्षकांनी तिला सुखरूप बाहेर आणले. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की जान्हवी कपूर गर्दीत अतिशय सभ्य पद्धतीने दिसत आहे.
  
जान्हवीचा पार्टी लुक

अभिनेत्रीच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी कपूर हिरव्या रंगाच्या मिनी स्कर्ट आणि पिवळ्या स्ट्रॅपी टॉपमध्ये सुंदर दिसत होती. अभिनेत्रीने तिच्या हातात एक पिशवी घेतली होती.जान्हवी कपूरची ही स्टाईल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.