मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. जान्हवीनं नुकतीच तिच्या चैन्नईच्या घराची हाऊस टूर (Janhvi Kapoor Chennai House Tour) तिच्या चाहत्यांना एक व्हिडीओ शेअर करत दिली. यावेळी जान्हवीनं खुलासा केला की अभिनेत्री आणि आई श्रीदेवीनं (Sridevi) तिच्या बाथरुमचं लॉक काढले होते आणि आता घराचे रेनोव्हेशन केले तरी सुद्धा जान्हवीच्या बाथरुममध्ये लॉक नाही.  (Janhvi Kapoor's Bathroom Lock)


जान्हवी ने शेअर केली श्रीदेवी च्या पहिल्या घराची झलक..

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


वोगनं इंडियानं त्यांच्या यूट्यूब अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला असून, या व्हिडिओमध्ये जान्हवीचे चेन्नईतील घर दाखवण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये जान्हवीचे घर आतून कसे दिसते ते पाहायला मिळत आहे. व्हिडीओत घरातल्या प्रत्येक गोष्टीविषयी जान्हवी सांगते. 'हे घर तिची आई श्रीदेवीने विकत घेतलं होतं, तिच्या आईनं घेतलेली पहिली प्रॉपर्टी म्हणजे हे घर आहे.' व्हिडिओमध्ये जान्हवी श्रीदेवी यांनी काढलेले पेंटिंग देखील दाखवते.


हेही वाचा : Angry Kajol: न्यासाने केली चेहऱ्याची सर्जरी? संतापलेल्या काजोलने ट्रोलर्सना दिलं असं उत्तर


'माझ्या आईसाठी हा बंगला खरेदी करणं फार कठीण होतं. तिच्या लग्नानंतर तिला हा बंगला डेकोरेट करायचा होता. जगभरातील ज्या ठिकाणांना तिने भेटी दिली. त्या ठिकांणाहून आणलेल्या वस्तूंनी तिला हा बंगला सजवायचा होता.' जान्हवीने वोग इंडियासह बनविलेल्या या व्हिडीओमध्ये श्रीदेवींबरोबरची तिची आठवण सांगताना वैयक्तिक आयुष्याबाबतही खुलासा केला', असे जान्हवी म्हणाली.


जान्हवीच्या बेडरुममधील बाथरुमला अजून लॉक नाही

 


पुढे जान्हवी म्हणाली, 'माझ्या बेडरुममधील बाथरुमला अजून लॉक नाही, कारण आई मला कधीच बाथरुमचं दार बंद करुन द्यायची नाही. मी बाथरुममध्ये जाऊन मुलांसोबत बोलेन अशी तिला भीती वाटायची. बंगल्यातील माझ्या रुममध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. परंतु, अजूनही रुममधील बाथरुमला लॉक लावलेलं नाही.' (Janhvi Kapoor Revealed Why Sridevi Did not Let Her To Lock The Bathroom Door Know The Reason) 



जान्हवीचा 'मिली' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. जान्हवी तिच्या आगामी 'बवाल' चित्रपटात ती अभिनेता वरुण धवनसोबत दिसणार आहे. हा चित्रपट 2023 मध्ये एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार आहे.