प्रत्येक पालक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी स्वप्न रंगवतात. त्यांनी शिक्षण, करिअर आणि लग्न याबद्दल आई वडील अनेक गोष्टी ठरवतात. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांनीही जान्हवी कपूर आणि खुशी कपूरसाठी अनेक गोष्टी ठरवल्या होत्या. पण श्रीदेवी आणि बोनी कपूर यांनी लेकींसाठी वेगवेगळ्या गोष्टी ठरवल्या होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका कार्यक्रम दरम्यान जान्हवी कपूर यांनी वडील बोनी कपूर यांनी जान्हवी आणि खुशीसाठी काय ठरवलं होतं हे गुपित सांगितलं. एवढंच नाही तर लग्नापूर्वी दोघी बहिणींनी काय करावं याबद्दलही बोनी कपूर यांनी ठरवलं होतं. 


बोनीच्या 'या' निर्णयाने श्रीदेवी वैतागल्या होत्या!


लग्नापूर्वी जान्हवी आणि खुशी यांनी संपूर्ण जग फिरावं अशी बोनी कपूरची इच्छा होती. जान्हवी म्हणाली की, 'जेव्हा आमचं लग्न होईल तेव्हा आमच्या नवऱ्यावर आम्हाला फिरण्याबद्दल कुठलाही दबाव पडू नये. नवऱ्यांनी आम्हाला फिरण्याबद्दल म्हटलं तर आम्ही त्यांना म्हणून की आम्हाला हे सगळं वडिलांनी दाखवलं आहे.'


बोनी कपूर यांनी फिरण्यासाठी एवढा मोठ्या दिवसांचा प्लॅन केला होता की, यामुळे श्रीदेवी खूप वैतागली होती, असंही तिने सांगितलं. पुढे ती म्हणाली की, पण जेव्हा आम्ही फिरायला गेलो तेव्हा श्रीदेवी यांनी खूप एन्जॉय केलं. 


बोनी यांना प्रवासादरम्यान एक गोष्टी कायम हवी असायची!


जान्हवी कपूर म्हणाली की, 'विदेशात आम्ही खास जीपमध्ये फिरायचो. त्यामुळे आमचा कुक रामूदेखील आमच्या सोबत असायचा. रामू हा बोनी कपूरचा फक्त कुक नव्हता तर एक मित्र होता. बोनी कपूर यांना विदेशातील जेवण्यातील मिर्ची तिखट नव्हती वाटतं. म्हणून रोम आणि इटलीमधील रस्त्यांवर फिरताना आमच्यासोबत भारतीय लाल तिखट मिर्ची असायची.'


जान्हवीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, आगामी चित्रपटाची भल्ली मोठी रांग आहे. ती राम चरणसोबत आरसी16, उलझ, देवरा पार्ट1, मिस्टर आणि मिसेस माही या चित्रटातून झळकणार आहे.