Janhvi Kapoor Mili Movie : जान्हवी कपूरने फार कमी कालावधीत इंडस्ट्रीत (Bollywood) एक वेगळं स्थान निर्माण केलंय. वेगवेगळ्या प्रकारची व्यक्तिरेखा साकार करून तिने स्वत:मधील योग्यता सिद्ध केली आहे. तिच्यात अभिनय कौशल्याची कमतरता नाही, हे देखील तिने सर्वांना दाखवून दिलंय. सध्या ती तिच्या आगामी 'मिली' चित्रपटामुळे (Mili Movie) चर्चेत आहे. इतर चित्रपटांप्रमाणे या चित्रपटातही जान्हवी (Janhvi Kapoor) एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जान्हवी कपूरचा आगामी चित्रपट 'मिली' आता रिलीजसाठी सज्ज झालाय. पण या चित्रपटाचे शूटिंग जान्हवीसाठी सोपं काम नव्हतं. या चित्रपटासाठी जान्हवी कपूरलाही मानसिक आघातातून जावं लागलं. त्याचा एक किस्सा जान्हवी कपूरने शेअर केला आहे.


आणखी वाचा - खरंच अश्लील चित्रपट बनवले होते का? शिल्पा शेट्टीच्या पतीने पहिल्यांदाच दिलं उत्तर


मिली चित्रपटाचा ट्रेलर (Mili Trailer) रिलीज करण्यात आलाय. त्यात जान्हवी कपूर एका भयभित मुलीची भूमिका साकारत आहे. जान्हवीने नुकतंच तिच्या भूमिकेबद्दल सांगितलं...या पात्रासाठी तिला मानसिक आघात सहन करावा, असा खुलासा तिने केलाय. या पात्राचा त्याच्यावर खोलवर परिणाम झाला. इतकं की ती आजारी पडली होती, औषधांच्या मदतीने तिने गोळी देखील घेतली होती.


नेमकं काय म्हणाली Janhvi Kapoor ?


रात्री मला भीतीदायक स्वप्ने पडू लागली. या पात्राचा माझ्या जीवनावर खोलवर परिणाम झाला आहे. मला आठवतंय की, या चित्रपटाच्या (Janhvi Kapoor Movie) शूटिंगदरम्यान माझ्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम झाला होता. चित्रित केलेल्या दृश्यांबद्दलच स्वप्नं यायची. मी दोन ते तीन दिवस पेन किलरही घेतली. मीच नाही तर खुद्द दिग्दर्शकही आजारी पडले होते, असं जान्हवीने सांगितलं आहे