Janhvi Kapoor Wedding Plan : बॉलिवूडचे लोकप्रिय निर्माते बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूर सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. लवकरच जान्हवी ही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या जान्हवी ही तिच्या चित्रपटामुळे नाही तर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. खरंतर जान्हवी ही गेल्या काही दिवसांपासून शिखर पहाडियासोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून शिखर पहाडियासोबत जान्हवी दिसली, कधी मंदिरात दर्शन घेताना तर कधी पार्टीत. आता तर 'मैदान' च्या स्क्रिनिंगवेळी जान्हवीनं एक नेकलेस घातला होता. त्यावर शिकू लिहिलं होतं. या सगळ्यात जान्हवी कपूरचा एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. यात जान्हवी तिच्या लग्नाविषयी बोलताना दिसते. 



जान्हवी कपूरनं 2021 मध्ये दिलेल्या ‘ब्राइड्स टुडे’ च्या मुलाखतीत तिच्या ड्रीम वेडिंग विषयी सांगितलं आहे. तिनं म्हटलं की तिला ‘तिरुपति मंदिर’ मध्ये लग्न करायची इच्छा आहे.  "लग्नाला घेऊन माझ्या मनात आधीपासून एक स्पष्ट चित्र आहे. मला तिरुपतीला लग्न करायची इच्छा आहे. ही खूप इंटीमेट सेरेमनी असेल. मला माहित आहे की मी काय परिधान करणार. एक गोल्डन जरीची कांजीवरम साडी आणि माझ्या केसात खूप मोगरा. माझा नवरा लुंगीत असेल आणि आम्ही सगळे लग्नानंतर केळ्याच्या पानात जेवण करु."


जान्हवी कपूर ही कोणताही महत्त्वाचा दिवस असला की ती तिरुपती मंदिरला जात असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. ती अनेकदा चालत जाऊन पुढे गुडघ्यावर जाणाऱ्या पायऱ्या चढत मंदिरात जाते. या वर्षी वाढदिवसाच्या निमित्तानं जान्हवी, तिचा बॉयफ्रेंज शिखर पहाडिया, तिच्या काकू आणि मित्र ऑरी यांच्यासोबत गेली होती. त्यांनी सगळ्यांनी मिळून तिरुपती बालाजीचा आशीर्वाद घेतला.  


हेही वाचा : 'तारक मेहता...' मधून तिसऱ्या सोनूचीही अचानक एक्झिट? निर्माते चौथ्या सोनूच्या शोधात!


जान्हवीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती वरुण धवनच्या आगामी चित्रपट बवालमध्ये दिसणार आहे. त्याशिवाय ती लवकरच ज्युनियर एनटीआरच्या देवरा या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. याशिवाय ‘उलझ’ या चित्रपटात दिसणार असून आयएफएस अधिकाऱ्याची भूमिकेत दिसणार आहे.