Japanese Couple Watching Jailer : दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत यांचा जेलर हा चित्रपट आज 10 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. त्यांचा चित्रपट पाहता यावा यासाठी अनेकांना ऑफिसातून सुट्टी दिली. इतकंच नाही तर सुट्टी मिळाल्यानं प्रेक्षकांनी थिएटरमध्ये देखील गर्दी केली आहे. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रजनीकांत यांचे किती चाहते आहेत. हे सांगण्याची कोणालाही गरज नाही. खरंतर रजणीकांत यांचे परदेशात लाखो चाहते आहेत. त्यांचा जेलर पाहण्यासाठी हे प्रेक्षक उत्सुक आहेत. पण कोणत्याही प्रकारची उत्सुकता असली तरी देखील प्रेक्षक लांबच लांब राग लावत चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असतात. यात सगळ्यात मोठी बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे जपानमधील ओसाका या शहरातून एक जोडप चित्रपट पाहण्यासाठी चेन्नईत आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जपानमधील ओसाका येथे राहणारा यासुदा हिदेतोशी आणि त्याची पत्नी रजनीकांत यांचा 'जेलर' चित्रपट पाहण्यासाठी चेन्नईला पोहोचले आहेत. PTI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये यासुदा हिदेतोशीनं सांगितलं, 'जेलर' चित्रपट पाहण्यासाठी आम्ही जपानहून चेन्नईला आलो आहोत' असे यासुदा हिदेतोशी आणि त्याची पत्नीचा या व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसते.  



जेलर या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबतच जॅकी जॅकी श्रॉफ, रम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, विनायकन आणि योगी बाबू दिसणार आहेत. तर मोहनलाल यांची पाहुण्या कलाकाराची भूमिका असल्याचे म्हटले जाते. या चित्रपटाचे दिग्दर्शन नेल्सन दिलीपकुमार यांनी केली आहे. रजनीकांत हे तब्बल दोन वर्षांनी मोठ्या पडद्यावर परत येत आहे. दरम्यान, या चित्रपटातील काही गाणी नुकतीच प्रदर्शित झाली आहे. 'कावला' आणि 'हुकुम' अशी ही गाणी आहेत. ही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आाहेत. त्यातही 'कावला' हे गाणं आहे. हे गाणं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर सगळेच हूक स्टेपवर डान्स करताना दिसत आहेत. 


हेही वाचा : गौतमीच्या डान्सला नावं ठेवणाऱ्या माधुरीनं तिला स्टेजवरच गाठलं आणि...


रजनीकांत यांचा चित्रपट पाहण्यासाठी पोहोचलेल्या प्रेक्षकांनी त्यांच्या पोस्टरची पूजा केली अनेकांनी त्यावर दूध वाहिलं. रजनीकांत यांचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यांचे लूक आणि सिग्नेचर या प्रेक्षकांमध्ये नेहमीच फेमस होतात.