‘ये लोग डरपोक होते हैं’, बलात्काराची धमकी मिळताच असं का म्हणाली प्रसिद्ध अभिनेत्री?
बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांना अभिनेत्रीचं चोख प्रत्युत्तर
मुंबई : आजपर्यंत अनेक सेलिब्रिटींना (Film Industry) जीवे मारण्याची आणि बलात्काराची (death and rape) धमकी मिळाळी. तेव्हा अस्वस्थ झालेल्या कलाकारांनी पोलिसांची मदत घेतली तर, काहींनी मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी मिळाल्याची घटना चाहत्यांसोबत शेअर केली. आता अभिनेत्री जास्मिन भसीनने (Jasmin Bhasin) तिला मिळालेल्या धमकीबाबत एका मुलाखतीत सांगितलं आहे. 'बिग बॉस 14' (Bigg Boss 14) नंतर अभिनेत्री प्रकाशझोतात आलेल्या जास्मिनने एका मुलाखतीत ‘रेप आणि मर्डर’च्या धमक्यांवर उघडपणे सांगितलं.
जास्मिन भसीन धमक्यांबद्दल म्हणाली, 'बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर मला बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी मिळाली. मी एका शोमध्ये दिसली, पण त्यांनी मला पसंद केलं नाही. म्हणून अनेक धमक्या आल्या...'
'सुरुवातीला धमक्या मिळाल्यानंतर मी प्रचंड घाबरली. मला ज्या गोष्टींचा सामना करावा लागला ते खूप गंभीर होतं. या सर्व गोष्टींचा माझ्यावर मानसिक परिणाम झाला. तेव्हा, मी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतला. माझे मित्र, कुटुंब आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या मदतीने त्यावर मात केली.'
ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देत जास्मिन म्हणाली, ट्रोल करणाऱ्यांना वाटते की ते काहीही लिहू शकतात. हिम्मत असेल तर स्वतःची ओळख तयार करुन दाखवा. हे लोक डरपोक असतात, ज्यांना तुम्हाला फक्त आणि फक्त पराभूत करायचं असतं. (Jasmin Bhasin social media)
जास्मिन टीव्ही इंडस्ट्रीतील (TV Actress) फार मोठं नाव आहे. ती बिग बॉसच्या सर्वात लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक होती. सध्या ती अली गोनीसोबत (Ali Goni) रिलेशनशिपमध्ये आहे. त्या दोघांचा लव्ह अँगल बिग बॉसमध्येही लोकांना खूप आवडला होता.