मुंबई : अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडल्याने आज तातडीने डॉक्टर जोधपूरला रवाना झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अचानक आलेल्या या बातमीमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. 


झी न्यूजला दिली माहिती  


जया बच्चन यांनी बीग बींच्या आरोग्याबाबत झी न्यूजला माहिती दिली आहे. आता बीग बीची तब्येत ठीक असल्याचेही जया बच्चन यांनी सांगितले आहे. 


जोधपूरमध्ये शूटिंग  


सध्या बीग बी जोधपूरमध्ये 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या शूटिंगच्या शेड्युल दरम्यान बीग बींची प्रकृती खालावली आहे.
बदललेलं वातावरण आणि जेवणखाण यामुळे त्यांना त्रास होत असल्याची प्राथमिक माहिती आहे. 



 


रजनीकांतनी केली प्रार्थना 


अभिनेता रजनीकांत सध्या तीर्थयात्रेसाठी देहरादूनला आहेत. तेथेच त्यांनी बीग बींच्या प्रकृतीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आहे. 


 




बीग बींना त्रास होत असल्याने 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'चं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. बीग बींना पोटदुखीचा त्रास होत असल्याने खासगी चार्टर विमानाने डॉक्टरांची टीम जोधपूरला पोहचली आहे. 



जोधपूरचं खास कौतुक 


नुकताच बीग बींनी जोधपूरच्या सौंदर्याचं वर्णन करणारा एक ब्लॉग शेअर केला होता. या ब्लॉगमध्ये प्रकृतीच्या तपासणीसाठी डॉक्टर येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आरोग्याबाबत वेळोवेळी माहिती दिली जाईल असे त्यांनी सांगितले आहे. 


बीग बींसोबत आमिर खान, कॅटरिना कैफ 


अमिताभ बच्चनसोबत आमीर खान आणि कॅटरिना कैफदेखील दिसणार आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट आणि बीग बी हे कॉम्बिनेशन पहिल्यांदा रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. 
यशराज फिल्म प्रोडक्शन निर्मित 'ठ्ग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य करणार आहेत.