मुंबई : तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित 'थलायवी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री कंगना या सिनेमात जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला... या सिनेमातून त्यांच्या वेग-वेगळ्या बाजू मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकारणात येण्याआधी जयललिता एक उत्तम अभिनेत्री होत्या. राजकारणात येण्याआधी त्या तामिळ, कन्नड आणि तेलुगू सिनेमांत दिसल्या होत्या. त्यांनी कधीच सिनेमात येण्याचा विचार केला नाही. ना कधी राजकारणात येण्याचा त्यांनी विचार केला होता. शालेय जीवनात त्या खूप हुशार होत्या. मात्र सर्वसामांन्य मुलींप्रमाणेच त्यांची भरपूर स्वप्न पाहिली होती.


जयललिता जेव्हा शिक्षण घेत होत्या, तेव्हा त्या बाकीच्या मुलींप्रमाणेच प्रसिद्ध नॉरी कॉन्ट्रेक्टर नावाच्या क्रिकेटरला पसंत करायच्या. त्या कायम त्यांना पाहण्यासाठी टेस्ट मॅच पाहायला जायच्या. सिमी ग्रेवार यांच्या शोमध्ये त्यांनी सांगितलं होतं की,  नारी कॉन्ट्रेटर माझं क्रश होते. मी फक्त त्यांना पाहायला टेस्ट मॅच पाहायला जायचे.



जयललिता शम्मी कपूर यांना भरपूर पसंत करायच्या. 'जंगली' हा सिनेमा  त्यांचा आवडता सिनेमा होता, याच सिनेमातील गाणं 'कोई मुझे जंगली कहे' हे गाणं त्यांना भरपूर आवडायचं. त्यांनी सांगितलं की, शम्मी कपूर माझे क्रश होते. मी त्यांचे आणि नारी कॉन्ट्रेटरचे फोटो जमा करायचे.



जयललिता यांनी १४० पेक्षा अधिक तामिळ, तेलुगु, कन्नड, सिनेमांत काम केलं आहे. बॉलिवूडमध्ये त्यांनी एकाच सिनेमात काम केलं होतं. 'ईज्जत' या सिनेमात त्यांनी धर्मेंद्रसोबत स्क्रिन शेअर केली होती. हा सिनेमा १९६८ मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमातील 'रुक जा जरा', 'किधर को चला' ही गाणी हिट झाली. मात्र हा सिनेमा फारसा चालला नाही.


 


जयललिता अन्नाद्रमुकचे संस्थापक एमजी रामचंद्रन यांच्या जवळ होत्या. एमजीआरदेखील एकीकाळचे तामिळ सुपरस्टार होते. त्यांच्याच सांगण्यावरुन जययलिता यांनी राजकारणात पाऊल टाकलं होतं आणि लोकांनी देखील जयललिता यांना भरभरुन प्रेम दिलं. लोक त्यांना प्रेमानं 'अम्मा' म्हणायचे.