Entertainment News : सेलिब्रिटी आणि त्यांच्या नात्याविषयी कायमच कैक चर्चा होतात. अनेकदा या चर्चांना वाव मिळण्याचं कारण ठरतं ते म्हणजे त्या सेलिब्रिटींचं खासगी आयुष्य. अमुक एका व्यक्तीशी नाव जोडलं जाणं किंवा तमुक एका व्यक्तीपासून दुरावा किंवा मतभेद असणं या आणि अशा अनेक कारणांनी ही कलाकार मंडळी चर्चांच्या केंद्रस्थानी असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशाच एका सेलिब्रिटींपैकी आणि अनेक चाहत्यांच्या मनाचा ठाव घेणारी एक अभिनेत्री सध्या खासगी जीवनातील अतिशय महत्त्वाच्या वळणावर असून, यामुळंच तिनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ही अभिनेत्री आणि गायिका म्हणजे जेनिफर लोपेज. गेल्या बऱ्याच काळापासून जेनिफरच्या वैवाहिकत नात्यात तणावाची परिस्थिती उदभवल्याचं म्हटलं जात आहे. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळालाय तो म्हणजे जेनिफर आणि तिचा पती बेन एफ्लेक यांनी केलेल्या घटस्फोटाच्या अर्जामुळं. 


लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली त्याच दिवशी या जोडीनं एलए काऊंटी सुपीरियर न्यायालय इथं घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. 26 एप्रिलपासून ही जोडी विभक्त झाल्याचं सध्या सांगितलं जात आहे. 


हॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी... 


जेनिफर आणि बेन हॉलिवूडमधील एक लोकप्रिय जोडी म्हणून चाहत्यांमध्ये प्रसिद्ध होते. 2022 मध्ये म्हणजेच दोन वर्षांपूर्वी त्यांनी लग्न करत नात्याला एक सुरेख ओळख दिली होती. सूत्रांच्या माहितीनुसार जेनिफर आणि बेन या दोघांनही एकाच वर्षाच्या आत दोन वेळा लग्न केलं होतं. 2022 च्या जुलै महिन्यात लास वेगास आणि 2022 च्या ऑगस्ट महिन्यात जॉर्जिया इथं ही जोडी सहजीवनाची सुरुवात करताना दिसली. 


नात्यात आलेल्या याच वादळासमवेत जेनिफर चौथ्यांदा तर, बेन दुसऱ्यांचा घटस्फोट घेत आहेत. सूत्रांचा हवाला देत डेली मेलनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार जेनिफर आणि बेन यांच्यामध्ये लग्नाआधी कोणताही करार झाला नव्हता, त्यामुळं त्यांची संपत्ती, पैसे, मोठे ब्रँड डील किंवा मोशन पिक्चरमधून होणारी कमाई आजा समाजिक कार्यांसाठी विभागून दिली जाणार आहे. 



दरम्यान न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार जेनिफरनं बेनकडून घटस्फोट घेतेवेळी कोणतीही अपेक्षा किंवा मागणी केलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार काही आर्थिक कारणांमुळं या जोडीच्या नात्यात दुरावा आला आहे. याच वर्षीच्या 2 जूननंतर या जोडीचा कोणताही एकत्र फोटो किंवा समोर न आल्यानं त्यांच्या नात्यातील दुराव्याच्या चर्चांना वाव मिळाला होता. अखेर आता या चर्चांना घटस्फोटाच्या अधिकृत वृत्तानं पूर्णविराम मिळताना दिसत आहे.