मुंबई : अभिनेता दिलीप जोशी आपल्या करिअरबाबत चिंतेत होते तेव्हाच त्यांना 'तारक मेहता का उल्टा चष्मा'  (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका मिळाली. या मालिकेने दिलीप जोशी यांना दुसरा जन्म दिला असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. दिलीप जोशी आता जेठालाला या भूमिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचले आहेत. 


दिशा वकानीप्रमाणेच दिलीप जोशी मालिका सोडणार? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाच जेठालाल यांची भूमिका आवडते. तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका जेठालाल यांच्या पात्राशिवाय अर्धवट आहे. असं असताना आता दिलीप जोशी देखील जेठालाल या पात्राचा निरोप घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. 


दिशा वकानीसह दिलीप जोशी या कॉमेडी शोचा निरोप घेणार आहे. अशी चर्चा रंगली आहे. यावर पहिल्यांदाच दिलीप जोशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (टप्पूसोबतच्या अफेअरच्या चर्चेनंतर 'तारक मेहता' फेम बबीताकडून प्रेमाची कबुली?) 


 


दिलीप जोशी यांची पहिली प्रतिक्रिया 


दिलीप जोशी यांनी म्हटलं की,'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका खूप सुंदर प्रकारे सुरू आहे. असं असताना मी मालिका का सोडणार? तसेच पुढे जोशी म्हणाले की,'या मालिकेने मला बरंच काही दिलं आहे. जेठालाल या भूमिकेमुळे प्रेक्षक माझ्यावर खूप प्रेम करतात. हे प्रेम मला गमवायचं नाही.'


महत्वाचं म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका मिळण्यापूर्वी एक वर्ष माझ्याकडे काहीच काम नव्हतं. मी असाच फिरत होतो. दिलीप जोशी ज्या मालिकेत काम करत होते ती मालिका बंद झाली होती. 


कोणतंही काम नसताना, पैसे नसताना तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने त्यांना आधार दिला आहे. हळू हळू ही मालिका, जेठालाल हे पात्र प्रेक्षकांना पसंत पडलं. त्यानंतर दिलीप जोशी यांना कधीच मागे वळून पाहायला लागलं नाही.