Manisha Rani : लाखो लोकांच्या मनावर राज्य करणारी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि रिअॅलिटी शो विजेती मनीषा राणी ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मनीषा इथपर्यंत पोहोचायला खूप मेहनत केली आहे. तिच्या टॅलेन्टच्या जोरावर मनीषानं बिहार ते मुंबई असा यशस्वी प्रवास केला. मनीषा राणी ही 'झलक दिखला जा 11' मध्ये एक वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून आली आणि शोची विजेती होऊन बाहेर आली. त्यानंतर तिच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली आहे. मात्र, मनीषाला अजून तिची विनिंग अमाऊंट मिळालेली नाही. खरंतर, मनीषानं एका व्हिडीओत हा खुलासा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनीषा यावेळी तिचा मित्र महेश केशवाला उर्फ यूट्यूबर ठगेशसोबत एक मुलाखत दिली होती. त्यात मनीषानं हा खुलासा केला आहे. त्याचा व्लॉग मनीषानं शेअर केला आहे. यात मनीषा ठगेशशी बोलताना दिसते की "मी एक चहाचं दुकाण सुरु करायला हवं आणि ठगेशनं त्यासाठी स्पॉन्सर करायला हवं." यावर ठगेश बोलतो की 'मनीषानं झलक दिखलाजा 11 जिंकलं आहे, त्यामुळे तिनं हे स्पॉन्सर करायला हवं.' त्यावर उत्तर देत मनीषा म्हणाली की "झलकची विनिंग अमाउंट अजून तिला मिळालेली नाही. अर्धी रक्कम तर ते कापून घेतील." मनीषा मग म्हणाली की "जेव्हा त्यांचा पार्टनर श्रीमंत असतो, तेव्हा कसे लोक अजून श्रीमंत होतात." मनीषाच्या या वक्तव्यानं सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. 


हेही वाचा : 'तुझी आईच माझी सासू बनणार'; VIDEO शेअर करत मानसी नाईकनं दिली हिंट!


मनीषाविषयी बोलायचे झाले तर तिनं 'झलक दिखला जा 11' मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री केली असली तरी सगळ्यांची मने जिंकली. तिच्या परफॉर्मन्सनं तिनं सगळ्यांची मने जिंकली. विजेती ठरल्यानंतर मनीषाला 30 लाख रुपये आणि एक ट्रॉफी मिळाली. त्याआधी मनीषा ही बिग बॉस ओटीटी 2 मध्ये दिसली होती. या शोमध्ये देखील मनीषा अनेकांच्या पसंतीस उतरली. त्या शोमध्ये मनीषा आणि एल्विश यादव आणि अभिषेक मल्हान यांची चांगली मैत्री झाली. तर या शोचा विजेता एल्विश ठरला तर मनीषा सेकेन्ड रनरअप ठरली होती. मनीषा राणीचे इन्स्टाग्रामवर 12.5 मिलियन फॉलोवर्स आहेत. ती सोशल मीडियावर सक्रिय असून पोस्ट आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.